युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

जनतेच्या समस्यांचे जागेवरच निराकरण

ना. पंकजा मुंडे मंत्री झाल्यानंतर प्रथमच परळीत ; यशःश्री निवासस्थान गर्दीने फुलले

जनतेच्या समस्यांचे जागेवरच निराकरण

परळी वैजनाथ।दिनांक ०९।

राज्याच्या पर्यावरण, वातारणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांचे मंत्री झाल्यानंतर प्रथमच शहरात आगमन झाले,त्यांना भेटून समस्या मांडण्यासाठी यशःश्री निवासस्थान अक्षरशः गर्दीने फुलून गेले होते. ना. पंकजाताईंनी प्रत्येकाला वैयक्तिक भेटून त्यांची गाऱ्हाणी ऐकली व त्यांच्या प्रश्नांचा जागेवरच निराकरण केले.


    ना. पंकजा मुंडे यांचे बुधवारी रात्री उशीरा शहरात आगमन झाले. मंत्री झाल्यानंतर प्रथमच आल्या तरी कुठलाही गाजावाजा, मोठा सत्कार करू नये अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या होत्या. आज सकाळपासूनच यशःश्री निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी जिल्हयातील तसेच जिल्हया बाहेरून नागरिक व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. आलेल्या प्रत्येकांना भेटत, त्यांची गाऱ्हाणी ऐकून घेत त्यांनी जनतेच्या समस्यांचे जागेवरच निराकरण केले. 

  लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या पुण्याईचा वसा अन् वारसा जबाबदारीने पुढे नेण्याची प्रेरणा देणारी ही गर्दी होती.

परळीकर नागरिकांनी केलेले स्वागत नम्रतापूर्वक स्वीकारून पक्षाने सोपवलेल्या दायित्वाचा वापर तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेल असं त्या यावेळी म्हणाल्या.

सांत्वनपर भेट

--------

भाजपचे कार्यकर्ते किशोर केंद्रे यांच्या वडिलांचे नुकतेच दुःखद निधन झाले होते.ना. पंकजाताई मुंडे व माजी खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे यांनी आज त्यांच्या पदमावती भागातील निवासस्थानी जाऊन केंद्रे परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले. 

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या