इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

स्व. संतोष देशमुख यांना बैठकीत श्रध्दांजली

 ना. पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत परळीत भाजप सदस्यता महा अभियान बैठक:अधिकाधिक सदस्य करण्यासाठी जोमाने काम करा -ना.पंकजा मुंडे

प्रत्येक बुथ प्रमुखांनी अधिकाधिक सदस्य करण्यासाठी जोमाने काम करण्याचे केले आवाहन


परळी वैजनाथ।दिनांक १०।

भारतीय जनता पार्टी जगात क्रमांक एकचा पक्ष आहे. या पक्षाची विचारधारा समाजातील सर्व सामान्य लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी संघटन पर्व अंतर्गत जास्तीत जास्त  सदस्य आपल्याला करायचे आहेत, त्यासाठी प्रत्येक बुथ स्तरावरील कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे असे आवाहन राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केले.


   भाजपच्या सदस्यता महाअभियान अंतर्गत आज परळी मतदारसंघातील शक्ती केंद्रप्रमुख आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक अक्षता मंगल कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.


   भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात शक्तिशाली व मजबूत संघटन असलेला राजकीय पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण देशभर चांगले काम करत आहोत. सर्व सामान्य जनतेचे हित लक्षात घेऊन योजना अंमलात आणत आहोत. आगामी काळात पक्षाचा विस्तार अजून वाढविण्यासाठी सर्वांना अधिक जोमाने काम करायचे आहे. समाजाच्या सर्व स्तरातील घटकांतील लोक पक्षात आले पाहिजेत यासाठी सदस्यता महा अभियान सध्या देशभर राबविण्यात येत आहे, याचाच एक भाग म्हणून बुथ स्तरावरील प्रत्येक कार्यकर्त्यांनी किमान दोनशे नवीन सदस्य करावेत असे आवाहन ना. पंकजाताईंनी केले. मी आता राज्यात मंत्री आहे, हे पद माझ्यासाठी फक्त जनतेच्या सेवेसाठी आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्या बरोबरच संघटनात्मक बांधणी देखील तितकीच महत्वाची आहे असंही त्या म्हणाल्या.


स्व. संतोष देशमुख यांना बैठकीत श्रध्दांजली

--------

बैठकीच्या सुरवातीला मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांना भाजपच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. बैठकीचे संचलन शिवाजीराव गुट्टे यांनी केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, अभियानाचे प्रभारी नवनाथ शिराळे, तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इटके, जीवराज ढाकणे, श्रीहरी मुंडे, शाम आपेट, जीवनराव किर्दंत, दत्ता जाधव, अविनाश मोरे, वैजनाथ जगतकर, गणेश कराड आदी उपस्थित होते.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या