इमेज
  दारुने केला घात,साठेनगर मधील एका युवकाचा मृत्यू: नागरीक संतप्त; दारूबंदीसाठी पोलीस ठाण्यात ठिय्या परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       शहरातील साठेनगर भागात आज एका युवकाचा मृत्यू झाला असून दारूच्या व्यसनातूनच हा मृत्यू झाला असल्याचे त्याचे कुटुंबीय व साठेनगर मधील नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक वर्षापासून साठे नगर मधील दारूचे गुत्ते बंद करा अशी सातत्याने मागणी करण्यात येते. मात्र काही दिवस कारवाई होते. त्यानंतर पुन्हा जशास तसे दारूचे गुत्ते अखंडित सुरू असतात असा आरोप करण्यात आला आहे.      आमच्या साठेनगर मधील युवक व्यसनाधीन झाले असून दारूमुळे अनेक कुटुंबे उध्वस्त होत आहेत. त्यामुळे साठेनगर मध्ये दारूबंदी करा अशा प्रकारची मागणी आज साठेनगर मधील शेकडो नागरिकांनी संभाजीनगर पोलीस ठाण्यात केली. सुरेश मस्के या नावाच्या युवकाचा सकाळी मृत्यू झाला. दारूच्या नशेत  या युवकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. यापूर्वीही याच भागातील तीन युवकांचा दारूच्या नशेतूनच मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. साठेनगर भागात बिनदिक्कतपणे अवैध दारू विक्री होते. हातभट्टी द...

परळी वैजनाथ येथे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना सर्वपक्षीय अभिवादन

 बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा तरुण पिढीसाठी प्रेरणादायी-नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई धर्माधिकारी


८० टक्के समाजकारणाच्या विचारातूनच शिवसेना बळकट-शिवसेना नेते अभयकुमार ठक्कर

परळी (प्रतिनिधी):

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त परळी वैजनाथ येथे शिवसेना माजी नगराध्यक्ष अभयकुमार  ठक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुहृदयसम्राट जयंती उत्सव समितीच्या वतीने शुक्रवार दिनांक 23 जानेवारी रोजी भव्य सर्वपक्षीय अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक येथे सकाळी दहा वाजता परळीच्या नगराध्यक्षा सौ.पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, भाजप ज्येष्ठ नेते दत्तापा ईटके गुरुजी , माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अभयकुमार ठक्कर , राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ज्येष्ठ नेते प्रा.डॉ.मधुकर आघाव, राष्ट्रवादी काँग्रेस (S.P) ज्येष्ठ नेते बाळासाहेब देशमुख, शिवसेना (शिंदे गट)तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे, वैद्यनाथ मंदिराचे विश्वस्त राजेशजी देशमुख, न.प. गट नेते वजना सोळंके,रघुवीर देशमुख, अँड.अरुण पाठक, वैद्यनाथ बँक संचालक प्रकाश जोशी, प्रा.विनोद जगतकार,रवींद्र परदेशी, माजी उपराध्यक्ष सुरेश टाक, नरसेवक योगेश मेनकुदळे,राज पांडे, अँड.प्रणव मराठे शहर प्रमुख वैजनाथ माने, मनसे तालुका अध्यक्ष श्रीकांत पाथरकर, वंचित आघाडीचे नेते मिलिंद घाडगे, गोपाळ आंधळे, शहरातील प्रतिष्ठित व्यापारी शांतीलाल जैन,बंडू गरुड, नंदकिशोर तोतला, नंदकिशोर बियाणी यांच्या सह करीम शेख,अश्विन मोगरकर, नितीन समशेट्टी,गौतम साळवे, प्रा.शंकर कापसे,महादेव ईटके, अजय चौधरी, श्याम तोष्णीवाल, दत्ता सावंत, नागनाथ पवार, डी.के.माने, दत्ता दहिवाळ, किशोर केंद्रे, रमेश भोयटे,दिलीप जोशी, सौ.चित्राताई देशपांडे,यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी धूप-दीप व पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नगराध्यक्षा सौ. पद्मश्री धर्माधिकारी म्हणाल्या की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा ही तरुण पिढीला राष्ट्रसेवा, समाजसेवा आणि आदर्श जीवनाची प्रेरणा देणारी आहे. त्यांच्या कार्यातून सर्वांनी शिकण्याची गरज आहे असे त्या म्हणाल्या.

याप्रसंगी शिवसेना नेते अभयकुमार  ठक्कर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, गोरगरिबांची व सर्वसामान्यांची सेवा करणे आणि तमाम हिंदू बांधवांचे संरक्षण करणे या उद्देशानेच शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हा दिलेला मंत्र आजही शिवसैनिकांसाठी दिशादर्शक आहे. याच विचारधारेतून शिवसेना महाराष्ट्रात वटवृक्षासारखी वाढली. प्रत्येक शिवसैनिकाने समाजकार्यात स्वतःला झोकून देऊन गरजूंना मदत केली, तरच शिवसेनाप्रमुखांचा खरा उद्देश सफल होईल आणि पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे साहेबांचे हात अधिक बळकट होतील असे ते म्हणाले.

कार्यक्रमादरम्यान “जय भवानी, जय शिवाजी”, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अमर रहे”, “तुमचं आमचं नातं काय, जय भवानी जय शिवराय”, “जय महाराष्ट्र” अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

या सर्वपक्षीय अभिवादन सोहळ्यास परळी शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, नागरिक तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिंदुहृदयसम्राट जयंती उत्सव समितीचे माजी नगरसेवक रमेश चौंडे, प्रा. अतुल दुबे, मोहन परदेशी, श्रीनिवास सावजी, धनंजय मिश्रा, संजय कुकडे, अभिजित देशमुख, पापा सिंग ठाकूर, संजय वानरे,किशन बुंदिले, बबन ढेंबरे, शुभम ठाकूर, अमित कचरे, सचिन दराडे, सुरेश परदेशी, मनिष जोशी, योगेश घेवारे, विजय पवार, योगेश जाधव,  कृष्णा बेदरकर, बाळासाहेब देशमुख , विष्णु मुंडे आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या