इमेज
  दारुने केला घात,साठेनगर मधील एका युवकाचा मृत्यू: नागरीक संतप्त; दारूबंदीसाठी पोलीस ठाण्यात ठिय्या परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       शहरातील साठेनगर भागात आज एका युवकाचा मृत्यू झाला असून दारूच्या व्यसनातूनच हा मृत्यू झाला असल्याचे त्याचे कुटुंबीय व साठेनगर मधील नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक वर्षापासून साठे नगर मधील दारूचे गुत्ते बंद करा अशी सातत्याने मागणी करण्यात येते. मात्र काही दिवस कारवाई होते. त्यानंतर पुन्हा जशास तसे दारूचे गुत्ते अखंडित सुरू असतात असा आरोप करण्यात आला आहे.      आमच्या साठेनगर मधील युवक व्यसनाधीन झाले असून दारूमुळे अनेक कुटुंबे उध्वस्त होत आहेत. त्यामुळे साठेनगर मध्ये दारूबंदी करा अशा प्रकारची मागणी आज साठेनगर मधील शेकडो नागरिकांनी संभाजीनगर पोलीस ठाण्यात केली. सुरेश मस्के या नावाच्या युवकाचा सकाळी मृत्यू झाला. दारूच्या नशेत  या युवकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. यापूर्वीही याच भागातील तीन युवकांचा दारूच्या नशेतूनच मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. साठेनगर भागात बिनदिक्कतपणे अवैध दारू विक्री होते. हातभट्टी द...

स्व.श्यामराव देशमुख स्मृतिसमारोहातील उपक्रम

आज सामूहिक लोकनृत्य स्पर्धा: स्व.श्यामराव देशमुख स्मृतिसमारोहातील उपक्रम



परळी वै. (प्रतिनिधी)...

 कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय,परळी वै.येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. श्यामराजी देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित स्व. श्यामराजी देशमुख स्मृतिसमारोह–२०२६ अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी 'सामूहिक लोकनृत्य' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत परळी पंचक्रोशीतील शाळा व महाविद्यालयातील एकूण २० स्पर्धक संघ सहभागी होणार आहेत.त्यातील स्पर्धकांची संख्या जवळपास १५० आहे.

ही स्पर्धा सोमवार, दि. १९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. परळीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा मा.सौ. पद्मश्रीताई बाजीरावभैय्या धर्माधिकारी  यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन  होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.संजयजी देशमुख हे  राहणार आहेत. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक मा.श्री. अनिलरावजी देशमुख, सचिव मा. श्री. रवींद्रजी देशमुख, कोषाध्यक्ष मा. प्रा.प्रसादजी देशमुख तसेच प्राचार्य तथा संचालिका डॉ. विद्या देशपांडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.लोककला व लोकसंस्कृतीचे संवर्धन, विद्यार्थ्यांमधील कलागुणांना व्यासपीठ मिळावे तसेच संघभावना वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेमध्ये गोंधळ ,कोळीगीत, लावणी ,शेतकरी गीत ,बंगाली लोकनृत्य ,गुजराती लोकनृत्य,बंजारा लोकनृत्य , हरयाणवी लोकनृत्य ,छत्तीसगडचे लोकनृत्य,लेझीम असे विविध लोकनृत्य प्रकार सादर करण्यात येणार असून उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या संघांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील पारितोषिक वितरण मंगळवार, दि. २० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता सुप्रसिद्ध साहित्यिक व व्याख्याते मा. श्री. संजयजी कळमकर यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.

या सामूहिक लोकनृत्य स्पर्धेस विद्यार्थी, कलाप्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन सांस्कृतिक विभाग प्रमुख ,प्रा.डॉ.अरुण चव्हाण, प्रा.डॉ.पी.व्ही. गुट्टे ,प्रा.डॉ.कचरे एस.व्ही. , ,प्रा.डॉ. गुळभिले व्ही.डी. , प्रा. अशोक पवार , प्रा. अशिलता शिंदे यांच्यासह सर्व संयोजन समितीच्या वतीने  करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या