इमेज
  दारुने केला घात,साठेनगर मधील एका युवकाचा मृत्यू: नागरीक संतप्त; दारूबंदीसाठी पोलीस ठाण्यात ठिय्या परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       शहरातील साठेनगर भागात आज एका युवकाचा मृत्यू झाला असून दारूच्या व्यसनातूनच हा मृत्यू झाला असल्याचे त्याचे कुटुंबीय व साठेनगर मधील नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक वर्षापासून साठे नगर मधील दारूचे गुत्ते बंद करा अशी सातत्याने मागणी करण्यात येते. मात्र काही दिवस कारवाई होते. त्यानंतर पुन्हा जशास तसे दारूचे गुत्ते अखंडित सुरू असतात असा आरोप करण्यात आला आहे.      आमच्या साठेनगर मधील युवक व्यसनाधीन झाले असून दारूमुळे अनेक कुटुंबे उध्वस्त होत आहेत. त्यामुळे साठेनगर मध्ये दारूबंदी करा अशा प्रकारची मागणी आज साठेनगर मधील शेकडो नागरिकांनी संभाजीनगर पोलीस ठाण्यात केली. सुरेश मस्के या नावाच्या युवकाचा सकाळी मृत्यू झाला. दारूच्या नशेत  या युवकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. यापूर्वीही याच भागातील तीन युवकांचा दारूच्या नशेतूनच मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. साठेनगर भागात बिनदिक्कतपणे अवैध दारू विक्री होते. हातभट्टी द...

परळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक

 .....अन्यथा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका स्वतंत्र लढू - प्रा.टी.पी.मुंडे




परळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी ....

      परळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत शिवसेनेचे बीड जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.टी.पी.मुंडे  यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. महायुतीमध्ये आगामी होणाऱ्या बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये सन्मानपूर्वक जागा दिल्यास महायुती म्हणून लढणार अन्यथा शिवसेना परळी विधानसभा मतदारसंघात स्वतंत्रपणे लढणार आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. 

        जवाहरलाल नेहरू वरिष्ठ महाविद्यालय परळी येथे परळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे नेते विनायक गडदे, ज्येष्ठ नेते आप्पाराव पांढरे महाराज, भीमराव मुंडे, प्रभाकर  फड, संतराम गडदे, शंकर नागरगोजे, सूर्यकांत मुंडे, छत्रपती कावळे, मीराताई जगताप, घाडगे ताई आदी उपस्थितांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.         कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रा.टी.पी.मुंडे यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या जिल्हा परिषदा व पंचायत समिती निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या. युती होऊ अथवा न होवो कार्यकर्त्यांनी आपल्या जिल्हा परिषद गटात व पंचायत समिती गणात संपर्क वाढवून शिवसेनेचे संघटन मजबूत करावे. महायुती संदर्भात त्यांनी परळी तालुक्यातील नऊ जिल्हा परिषद व 18 पंचायत समिती गणामध्ये स्वातंत्र्य दिले तर स्वतंत्रपणे लढणार असा विश्वास व्यक्त केला. 

   यावेळी सुदाम शिंदे, इंद्रजीत दहिफळे, नरहरी आघाव, दिलीप जगताप, सिरसाळा शहर प्रमुख बल्ली गायकवाड, रावसाहेब देशमुख,सुग्रीव गडदे, आश्रुबा व्हावळे, कारभारी मोटे,ज्ञानोबा माऊली गडदे, बंडू कांदे, राम होळंबे, ज्ञानोबा माऊली फड, माणिक गुट्टे,दिनकर मुंडे, मधुकर मुंडे, अनिल पांचाळ,बबन देवकते, राहुल कांदे, हनुमंत गुट्टे, श्रीनिवास कुलकर्णी, बाळासाहेब कुलकर्णी, धनंजय कावळे, हरिभाऊ पाळवदे, उत्तम राठोड, मुक्ताराम देशमुख, रवी जगताप, माणिक दादा बनसोडे, बालासाहेब मुंडे, ब्रह्मदेव मुंडे, बालासाहेब शिंदे, ज्ञानोबा बनसोडे, नागनाथ मुंडे, वृक्षराज आंधळे, केशव फड, आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूर्यकांत मुंडे यांनी केले.. सूत्रसंचालन प्रा.संदीपान मुंडे यांनी तर आभार माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप (बबलू) मुंडे यांनी व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या