इमेज
  दारुने केला घात,साठेनगर मधील एका युवकाचा मृत्यू: नागरीक संतप्त; दारूबंदीसाठी पोलीस ठाण्यात ठिय्या परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       शहरातील साठेनगर भागात आज एका युवकाचा मृत्यू झाला असून दारूच्या व्यसनातूनच हा मृत्यू झाला असल्याचे त्याचे कुटुंबीय व साठेनगर मधील नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक वर्षापासून साठे नगर मधील दारूचे गुत्ते बंद करा अशी सातत्याने मागणी करण्यात येते. मात्र काही दिवस कारवाई होते. त्यानंतर पुन्हा जशास तसे दारूचे गुत्ते अखंडित सुरू असतात असा आरोप करण्यात आला आहे.      आमच्या साठेनगर मधील युवक व्यसनाधीन झाले असून दारूमुळे अनेक कुटुंबे उध्वस्त होत आहेत. त्यामुळे साठेनगर मध्ये दारूबंदी करा अशा प्रकारची मागणी आज साठेनगर मधील शेकडो नागरिकांनी संभाजीनगर पोलीस ठाण्यात केली. सुरेश मस्के या नावाच्या युवकाचा सकाळी मृत्यू झाला. दारूच्या नशेत  या युवकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. यापूर्वीही याच भागातील तीन युवकांचा दारूच्या नशेतूनच मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. साठेनगर भागात बिनदिक्कतपणे अवैध दारू विक्री होते. हातभट्टी द...

लोकाभिमुख कारभाराची चुणूक....

 नागरिकांची मागणी, तत्पर कृती : नागरिकांना त्रासदायक ठरणारे अनावश्यक गतिरोधक काढले व रस्त्यांवरील जोडपट्ट्यातील खड्डे बुजवण्यास सुरुवात

नगराध्यक्षा पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या लोकाभिमुख  कारभाराची चुणूक

परळी वैजनाथ | प्रतिनिधी....

परळी नगर परिषदेचा कारभार हाती घेताच नगराध्यक्ष सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी कोणताही कालापव्यय न करता थेट कामाला सुरुवात केलेली आहे. केवळ आश्वासनांवर नव्हे, तर प्रत्यक्ष निर्णय आणि अंमलबजावणीवर भर दिला आहे. या अनुषंगानेच अनेक लोकाभिमुख कामांपैकी नागरिकांतून मागणी असलेल्या व प्रत्यक्ष नागरिकांचा संबंध येणाऱ्या कामाची तातडीने दखल घेत याबाबतचे कार्यवाही त्यांनी अतिशय तत्परतेने केली आहे नागरिकांना त्रासदायक ठरणारे शहरातील मुख्य रस्त्यावरील अनावश्यक गतिरोधक हटवणे हटवणे तसेच शहरातील रस्त्यांवर जोड पट्ट्यांच्या ठिकाणी असलेले खड्डे भराव टाकून व्यवस्थित करण्याच्या कामाला सुरुवात झाली असून नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे. 

      शहरातील प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांवर नियमांना डावलून त्रासदायक ठरणारे गतिरोधके तयार करण्यात आली होती.या गतिरोधकांमुळे वाहनचालक, रुग्णवाहिका, ज्येष्ठ नागरिक व महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. याबाबतच्या सर्वसामान्य नागरिकांच्या अनेक तक्रारी व मागण्या निवडणूक प्रचार दरम्यान व त्यानंतर नागरिकांनी नगराध्यक्ष ताई बाजीराव धर्माधिकारी यांच्याकडे केल्या होत्या. या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष न करता नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नगरपरिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत कारवाईचे तात्काळ आदेश दिले. परिणामी अनेक ठिकाणी अनावश्यक व अनधिकृत गतिरोधक हटवण्यात आले. याचवेळी शहरातील रस्त्यांवरील खड्डे व खराब झालेले पॅचेस भराव टाकून बुजवण्याच्या कामालाही वेग देण्यात आला आहे.अनेक दिवस केवळ फाईलींमध्ये अडकून पडलेली कामे आता प्रत्यक्ष रस्त्यावर दिसू लागली आहेत. पावर हाऊस पासून रस्त्याचे पॅचेस दुरुस्त करून कॉंक्रिटीकरण करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष नगरसेवक बाजीराव भैय्या धर्माधिकारी, नगरसेवक वैजनाथ सोळंके, जयपाल लाहोटी , राजाखान पठाण, इस्माईल शेख, आनंत इंगळे यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        नागरिकांच्या मागणीनुसार तात्काळ कारवाई झाल्याने व ही कामे सुरू झाल्याने नागरिकात समाधान व्यक्त होत आहे. कोणतीही घोषणा न करता थेट कृतीतून त्यांनी प्रशासनाला कामाला लावले असून नगर परिषदेत शिस्तबद्ध आणि परिणामकारक कारभाराची सुरुवात झाली आहे.मूलभूत नागरी सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देत सुरू झालेल्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या