इमेज
  महेश नवमी निमित्त आयोजित आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ६१ जणांची आरोग्य तपासणी; ८० रक्तदात्यांनी केले रक्तदान परळी वैजनाथ | प्रतिनिधी       महेश नवमी २०२६ निमित्त स्व. कौसल्याबाई गोविंदलालजी नावंदर यांच्या स्मरणार्थ परळी माहेश्वरी महिला संघटना आणि परळी तालुका माहेश्वरी युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या समाजोपयोगी उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमात ६१ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली तर ८० रक्तदात्यांनी  रक्तदान केले.      या शिबिरामध्ये नागरिकांसाठी सीबीसी, एचबीए1, आणि लिक्विड प्रोफाईल यांसारख्या महत्त्वाच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. एकूण ६१ नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला , तर ८० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. यावेळी उपस्थित वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करत नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व पटवून दिले. तसेच निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले....

 महिलांच्या एकोपा व सामाजिक सौहार्दाचे प्रतीक ठरले संक्रांतीनिमित्त हळदीकुंकू



परळी (प्रतिनिधी):

संक्रांतीच्या पावन पर्वानिमित्त महिलांमधील स्नेह, समरसता आणि सामाजिक भावना अधिक दृढ व्हाव्यात या उद्देशाने कुलकर्णी, केंद्रे, वारद व नव्हाडे परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हळदीकुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला. परळी येथील गणेशपार भागात पत्रकार अनंत कुलकर्णी यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम संपन्न झाला.

दरवर्षी परंपरेनुसार एकत्र येत सामाजिक नातेबंध अधिक घट्ट करण्याचा संकल्प या कुटुंबियांनी जपला आहे. यंदाही कुलकर्णी, नव्हाडे, केंद्रे व वारद परिवारांनी एकत्र येत संक्रांतीचे औचित्य साधून हा उपक्रम राबवला. कार्यक्रमाला शहरातील विविध भागांतील महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. हळदीकुंकू हा केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक विधी न राहता महिलांच्या मनातील आनंद, सौहार्द आणि आपुलकी व्यक्त करणारा सामाजिक सोहळा ठरला.

या प्रसंगी परळी शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी विशेष भेट देत महिलांशी संवाद साधला. त्यांनी अशा उपक्रमांचे कौतुक करत महिलांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक जीवनात अधिक सक्रिय राहावे, असे आवाहन केले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष सामाजिक अधिष्ठान लाभले.

कार्यक्रमात शीतल कुलकर्णी, भाग्यश्री, सरिता वारद, ज्योती नव्हाडे व शिवानी वारद यांनी उपस्थित महिलांचे मनःपूर्वक स्वागत केले. पारंपरिक पद्धतीने हळदीकुंकू लावून वाण देण्यात आले. महिलांनी एकमेकांना शुभेच्छा देत संक्रांतीचा आनंद साजरा केला.

हा हळदीकुंकू कार्यक्रम महिलांच्या एकोपा, सामाजिक भावना आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन करणारा ठरला. अशा उपक्रमांतून समाजात आपुलकी, सहकार्य आणि सकारात्मकतेची भावना वृद्धिंगत होत असल्याचे चित्र दिसून आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या