तेली समाजाचा रविवारी राज्यस्तरीय मेळावा कोल्हापुरात


बीड जिल्ह्यातील तेली समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - ‌जिल्हाध्यक्ष संगमेश्वर फुटके 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

      महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आयोजित तेली समाजाचा राज्यस्तरीय मेळावा रविवार दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी कोल्हापूर येथील नष्टे लॉन, न्यू शाहूपुरी येथे दुपारी १२ ते ५ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.

    या मेळाव्यास राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, माजी खासदार रामदास तडस आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महासभेचे बीड जिल्हाध्यक्ष संगमेश्वर फुटके यांनी दिली आहे. या मेळाव्यास बीड जिल्ह्यातील तेली समाज बांधवांनी व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष संगमेश्वर फुटके, सचिव प्रा मधुकर शिंदे, तालुकाध्यक्ष मनोज जठार यांनी केले आहे. या मेळाव्यात संत जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळास स्वतंत्र दर्जा द्यावा, सोलापूर-मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वरांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे, मुंबई येथे समाज भवनासाठी जागा मंजूर करावी, पारंपरिक तेल व्यावसायिकांना संरक्षण द्यावे यासह विविध मागण्यांवर चर्चा होणार आहे.

टिप्पण्या