पोस्ट्स

ऑगस्ट १६, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
पालकांनी मुलांच्या शिक्षणावर जागता पहारा ठेवावा..! दिशाहीन होण्यापासून मुलांना वाचवणे ही पालकांचीही जबाबदारी - राम कुलकर्णी अंबाजोगाई (प्रतिनिधी)     पालकांनी मुलांना महाविद्यालयात शिक्षणासाठी पाठविले म्हणजे आपली जबाबदारी संपली, असे न समजता त्यांच्या शिक्षणाबरोबरच संगत, सवयी, वर्तन आणि व्यक्तिमत्त्व विकासाकडेही जागरूकतेने लक्ष द्यावे. अकरावी - बारावी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून, या काळात मुलांना दिशाहीन होण्यापासून वाचविण्याची जबाबदारी पालकांचीही आहे, असे प्रतिपादन भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी यांनी केले. खोलेश्वर कनिष्ठ महाविद्यालय, अंबाजोगाई येथे शनिवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी स्व.गोपीनाथराव मुंडे सभागृहात आयोजित पालक मेळावा - २०२६ मध्ये मार्गदर्शक तथा उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.दीपक फुलारी होते. यावेळी मंचावर उपप्राचार्य प्रा.गौतम गायकवाड, डॉ.बिभीषण फड, उपप्राचार्य आनंद पाठक, पर्यवेक्...

बीड जिल्ह्यासाठी अभिमानास्पद.... सर्व स्तरातून अभिनंदन!!!!

इमेज
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर ;देशभरातील 48 शिक्षकांची निवड बीड मधील एक शिक्षक ;महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश नवी दिल्ली, दि. 22 : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देत शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या देशभरातील 48 शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 साठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश आहे. शिक्षक दिनानिमित्त 5 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत हा पुरस्कार दिला जातो. नावीन्यपूर्ण अध्यापन, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्त्व विकास, शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केलेले प्रयत्न तसेच सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील चार मानकरी डॉ. कविता नरसिंगराव गित्ते – (बीड) :      केज येथील साने गुरुजी निवासी विद्यालयात मुख्याध्यापक ...

आरोपी पकडला...ग्रामीण पोलीसांची तत्पर कामगिरी

इमेज
  "तुझ्या मुलीला माझ्या स्वाधीन कर" म्हणत गोळीबार; तीन ते चार गोळ्या झाडल्या, ८५ वर्षीय वृद्ध जखमी, एकावर गुन्हा परळी वैजनाथ : प्रतिनिधी...      तालुक्यातील खोडवा सावरगाव तांडा येथे घरासमोर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत ८५ वर्षीय वृद्ध जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात एका ३१ वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.       पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश फुलसिंग जाधव (वय ५०, व्यवसाय शेती, रा. खोडवा सावरगाव तांडा, ता. परळी) यांच्या तक्रारीवरून परसराम विद्याधर जाधव (वय ३१, रा. खोडवा सावरगाव तांडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २१ ऑगस्ट रोजी रात्री साडेसातच्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घरासमोर घडली.फिर्यादी, त्यांची पत्नी आणि वडील घरासमोर बसले असताना आरोपीने रागाच्या भरात अनाधिकृत गावठी कट्ट्यातून  तीन ते चार गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या गोळीबारात फिर्यादीचे ८५ वर्षीय वडील फ...
इमेज
 ‘पुढच्या पिढीसाठी भूमी नव्हे, स्मशानभूमी ठेवून जात आहोत’ मृद व जलसंधारण दिनानिमित्त लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात विशेष व्याख्यान परळी वैजनाथ : प्रतिनिधी.. मातीची धूप, रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अतिवापर आणि जलप्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस ढासळत आहे. आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी भूमी नव्हे, तर स्मशानभूमी ठेवून जात आहोत, अशी परखड भूमिका प्रमुख व्याख्याते दीपक पवार यांनी मांडली. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त तसेच मृद व जलसंधारण दिनाचे औचित्य साधून विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख होते, तर प्राचार्या डॉ. व्ही. व्ही. देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविकात रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. विवेकानंद कवडे यांनी मृद व जलसंधारणाच्या क्षेत्रात सुधाकरराव नाईक यांनी केलेल...
इमेज
  ओंकार शुगर ग्रुप ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित गोवा : साखर उद्योगाच्या विकासातील उल्लेखनीय योगदान, व्यावसायिक उत्कृष्टता तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याची दखल घेत ओंकार शुगर ग्रुपला ‘Industry Excellence Award’ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले. गोवा येथे झालेल्या सोहळ्यात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ओंकार शुगर ग्रुपच्या वतीने संचालक ओमराजे बोत्रेपाटील यांनी पुरस्कार स्वीकारला. The Sugar Technologists’ Association of India (STAI), नवी दिल्ली यांच्या वतीने STAIच्या ८४व्या वार्षिक अधिवेशन व International Sugar Expo 2026 अंतर्गत १८ ते २० ऑगस्टदरम्यान गोव्यातील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अधिवेशनात साखर उद्योगातील तज्ज्ञ, तंत्रज्ञ, उद्योजक, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. ओंकार शुगर ग्रुपने साखर उद्योगासोबतच इथेनॉल, बायोएनर्जी, आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत विकास या क्षेत्रा...
इमेज
  तेली समाजाचा रविवारी राज्यस्तरीय मेळावा कोल्हापुरात बीड जिल्ह्यातील तेली समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - ‌जिल्हाध्यक्ष संगमेश्वर फुटके  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आयोजित तेली समाजाचा राज्यस्तरीय मेळावा रविवार दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी कोल्हापूर येथील नष्टे लॉन, न्यू शाहूपुरी येथे दुपारी १२ ते ५ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.     या मेळाव्यास राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, माजी खासदार रामदास तडस आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महासभेचे बीड जिल्हाध्यक्ष संगमेश्वर फुटके यांनी दिली आहे. या मेळाव्यास बीड जिल्ह्यातील तेली समाज बांधवांनी व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष संगमेश्वर फुटके, सचिव प्रा मधुकर शिंदे, तालुकाध्यक्ष मनोज जठार यांनी केले आहे. या मेळाव्यात संत जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळास स्वतंत्र दर्जा द्यावा, सोलापूर-मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्...

अश्विन मोगरकर यांची मागणी...

इमेज
  परळी नगरपरिषदेच्या सभांचे थेट प्रक्षेपण व पत्रकारांसाठी स्वतंत्र गॅलरीची मागणी परळी वैजनाथ : परळी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभांचे कामकाज अधिक पारदर्शक व्हावे आणि नागरिकांना नगरपरिषदेच्या निर्णयप्रक्रियेची माहिती थेट उपलब्ध व्हावी, यासाठी सर्वसाधारण सभांचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) सुरू करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे परळी शहर सरचिटणीस अश्विन मोगरकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभांमध्ये शहरातील विकासकामे, नागरिकांच्या समस्या, विविध योजनांची अंमलबजावणी, आर्थिक विषयांसह अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा करून निर्णय घेतले जातात. या निर्णयांची माहिती नागरिकांपर्यंत पारदर्शकपणे पोहोचणे आवश्यक असल्याचे मोगरकर यांनी निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या अधिकृत सोशल मीडिया माध्यमांसह डिजिटल प्लॅटफॉर्मवर सर्वसाधारण सभांचे नियमित Live Streaming करण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी. यामुळे नागरिकांना आपल्या शहराशी संबंधित विषयांवर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनामध्ये होणारी चर्चा थेट पाहता येईल तसेच...
इमेज
छायाचित्रकार संघटना परळीच्या वतीने जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा परळी वैजनाथ,प्रतिनिधी... परळीतील छायाचित्रकार संघटनेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात सकाळी9वा. सर्व छायाचित्रकार यांनी जिजामाता उद्यानात एकत्र येऊन महाराष्ट्राचा मानाचा भगवा फेटा बांधून घेतला व सर्वांनी *माता जिजाऊ* यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जयघोष केला उद्यानातील शंकर भगवान मूर्ती जवळ फोटोसेशन करून मोटार सायकल रॅलीने *छ. शिवाजी महाराज आण्णाभाऊ साठे, डॉ .बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती संभाजी महाराज* ,या महामानवांना पुष्पहार अर्पण करून रॅलीने सुयोग फोटो वर्ल्ड येथे कार्यक्रम स्थळी एकत्र आले.  या ठिकाणी मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते रवी वळसे यांच्या अध्यक्षतेत गटनेते न.प. वैजनाथराव सोळुंके शिक्षण सभापती योगेश जी मेनकुदळे, ह .भ ‌.प. कोकाटे महाराज या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला या तीनही पाहुण्यांनी सर्वांना या दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच आमच्या माध्यमातून परळीतील छायाचित्रकारांसाठी *छायाचित्रकार भवन* *आर्ट गॅलरी* साठी विशेष प्रयत्न करून ...

भावपूर्ण श्रद्धाजली....

इमेज
  इलेक्ट्रिकल व्यावसायिक धनराजआप्पा नरवणे यांचे निधन परळी : येथील गांधी मार्केट भागातील प्रसिद्ध इलेक्ट्रिकल व्यावसायिक धनराजआप्पा सांभाप्पा नरवणे (वय ८०) यांचे शुक्रवारी(दि.२१) सकाळी ७.१५ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने नरवणे कुटुंबीयांसह मित्रपरिवार व व्यापारी वर्गावर शोककळा पसरली आहे.      धनराजआप्पा नरवणे यांनी इलेक्ट्रिकल व्यवसायाच्या माध्यमातून परळी शहरात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.ते ॲड. शशिकांत नरवणे, ऑटोमोबाईल व्यावसायिक मकरंद नरवणे आणि सराफ व्यावसायिक विशाल नरवणे यांचे वडील होत. त्यांच्यावर आज शुक्रवारी (दि.२१) दुपारी ३ वाजता परळी-गंगाखेड रस्त्यावरील श्री शंभू महादेव मंदिराजवळील त्यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

इमेज
  परळीतील जीम ट्रेनर तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या परळी वैजनाथ : प्रतिनिधी.....     परळी वैजनाथ शहरातील इंदिरानगर परिसरात एका २३ वर्षीय तरुणीने आपल्या राहत्या घरी ओढणीच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.२०) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. तुलसी संजय कमळु असे मयत तरुणीचे नाव आहे. मयत तरुणी ही परळी शहरातील एका जिममध्ये ट्रेनर म्हणून कार्यरत होती. परिसरात ती परिचित युवती म्हणून ओळखली जात होती. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.        परळी शहरातील पद्मावती भागातील इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या या युवतीच्या घरी कोणी नव्हते. कुटुंबिय बाहेरगावी असल्याने ती घरात एकटीच होती. गुरुवारी (दि.२०) दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना समोर आली. या घटनेने परिसरात व परिचितांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच संभाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदना साठी परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. या प्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात तिच्...
इमेज
  पोलीस भरतीच्या  सरावावरून परतणाऱ्या दोन महिलांचा विनयभंग परळी वैजनाथ | प्रतिनिधी :         पोलीस भरतीच्या सरावासाठी गेलेल्या दोन महिलांचा पाठलाग करून त्यांच्याशी गैरवर्तन व विनयभंग केल्याची धक्कादायक घटना परळी शहरात घडली. महिलांनी घडलेल्या प्रकारानंतर पतीला बोलावून घेतले असता संबंधित तरुणांनी पतीलाही झटापट करुन पलायन केल्याची घटना घडली. दरम्यान, संशयितांनी आपली बजाज पल्सर दुचाकी (क्रमांक एमएच ४४ एएफ ५४४३) घटनास्थळी सोडून पलायन केले.याप्रकरणी एका ३० वर्षीय गृहिणीच्या तक्रारीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      पोलीसात दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी महिला व तीची मैत्रीण दोघींजणी या स्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीच्या तयारीसाठी मागील काही महिन्यांपासून  दररोज सकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत धावण्याचा सराव करतात. १८ ऑगस्ट रोजीही दोघी वैद्यनाथ महाविद्यालय परिसरात सरावासाठी गेल्या होत्या. सराव आटोपल्यानंतर रात्री सुमारे ७.४५ वाजता दोघी परळी- अंबाजोगाई रस्त्याने पायी घरी परतत असताना वैद्यनाथ महाविद्यालयाच्या बाजूस असलेल्य...

लाभ घेण्याचे आवाहन....

इमेज
  परळी वैजनाथ येथे २० ऑगस्ट रोजी 'श्रावण मास रुद्र पूजा' सोहळ्याचे आयोजन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधून 'द आर्ट ऑफ लिविंग' परिवारातर्फे परळी वैजनाथ येथे भव्य 'श्रावण मास रुद्र पूजा' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा विशेष धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम गुरुवार, दिनांक २० ऑगस्ट २०२६ रोजी संध्याकाळी ६:०० वाजता संपन्न होणार आहे. श्री श्री ज्ञान क्षेत्र (श्री श्री ज्ञान मंदिर, अय्यप्पा मंदिरच्या बाजूला, वैद्यनाथ मंदिर पार्किंगच्या पाठीमागे, परळी-वैजनाथ) येथे होणारा हा सोहळा परम पूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर जी यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आला आहे. श्रावण महिन्यात शिव उपासना केल्याने मनात शांती निर्माण होते, नकारात्मकता दूर होते, तसेच आरोग्य, समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग प्रशस्त होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या पवित्र रुद्र पूजेमध्ये सहभागी होण्यासाठी भाविकांना संकल्प नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहिती आणि संपर्कासाठी पुढील क्रमांकांवर संपर्क साधता येईल: 9860474821, 9850258565, 9373871876. आयोजकां त...
इमेज
  श्री जिव्हेश्वर विजय ग्रंथाच्या पारायणास प्रारंभ परळी वैजनाथ दि.18 (प्रतिनिधी) : भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सवा निमित्त आज पासून श्री संत जगमित्र नागा मंदिरामध्ये आज दि.18 ऑगस्ट 2026 ते दि.25 ऑगस्ट 2026 रोजी पर्यंत सकाळी 8 ते 11 वा. या वेळेत श्री जिव्हेश्वर विजय ग्रंथाचे पारायण होणार आहे. तसेच 11 ते 1 विविध भजनी मंडळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती साळी समाजाचे अध्यक्ष बालासाहेब बडकस व श्री जिव्हेश्वर महिला विकास प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा सौ. स्वाती ताटे यांनी दिली.  दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी श्री संत जगमित्र नागा मंदिरामध्ये भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव साजरा होणार आहे. तत्पुर्वी आज पासून श्री जिव्हेश्वर विजय ग्रंथाचे पारायण होणार आहे. शनिवार दि.22/08/2026 रोजी महिलांसाठी विविध स्पर्धा व दि.23/08/2026 रोजी लहान मुलांसाठी चित्रकला व सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात येणार आहे. दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी जन्मोत्सव साजरा करून भव्य अशी शोभायात्रा निघणार आहे. शिवाय सकाळी 10.30 ते 12.30 पर्यंत ह.भ.प. भरत महाराज सोडगीर यांचे किर्तन होणार आहे. तरी जास्...

धर्मप्रेमी नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

इमेज
  परळीत २२ पासून आठवडाभर वेदज्ञानाची मेजवानी पं. शिवकुमारजी शास्त्री, पं प्रदीपजी आर्य यांची मौलिक प्रवचने  परळी वैजनाथ , दि.१८-      मानवी जीवनाचे अध्यात्मिक, सामाजिक, कौटुंबिक कल्याण साधावे या उद्देशाने परळीतील आर्य समाजाच्या वतीने येत्या २२ ऑगस्ट पासून आध्यात्मिक, धार्मिक, राष्ट्रीय व सामाजिक विषयावर मौलिक प्रवचनांचे आयोजन करण्यात आले आहे.           महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेच्या मानव जीवन कल्याण आणि वेद प्रचार अभियानांतर्गत येथील आर्य समाजाच्या वतीने ‘श्रावणी वेदप्रचार सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, दि. २२ ऑगस्ट ते शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हा सप्ताह विविध धार्मिक, सामाजिक व वैचारिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. या सप्ताहासाठी आर्य जगतातील विद्वानांचे आगमन होणार असून पं. शिवकुमार जी शास्त्री (सहारनपूर, उत्तर प्रदेश) आणि पं. प्रदीप जी आर्य (फरीदाबाद, हरियाणा) हे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. सप्ताहादरम्यान दररोज सकाळी ५.३० ते ६.३० वाजता यज्ञ, ६.३० ते ७ वाजता भजनोपदेश, सकाळी ७ ते ...
इमेज
दर श्रावणी सोमवारनिमित्त नाथ प्रतिष्ठानतर्फे भाविकांना होणार साबुदाणा खिचडी, फळे वाटप: आज आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार उपक्रमाचा शुभारंभ  परळी वैजनाथ | प्रतिनिधी      पवित्र श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर परळी वैजनाथ येथे भाविकांसाठी विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त नाथ प्रतिष्ठान, परळी वैजनाथ यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे प्रत्येक सोमवारी भाविकांना  साबुदाणा खिचडी, फळे, राजगिरा लाडू व पाणी वाटप करण्यात येणार आहे. आज दि. १७ ऑगस्ट रोजी या ‘प्रसाद वाटप’ उपक्रमाचा शुभारंभ आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आहे.        सोमवार, दि.१७ रोजी सकाळी ९.३० वाजता वैद्यनाथ प्रतिष्ठान नगर परिषदेच्या बाजूला, परळी वैजनाथ येथे  या उपक्रमाचा शुभारंभ आ. धनंजय मुंडे, (अध्यक्ष, नाथ प्रतिष्ठान) यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास अजय मुंडे, नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.श्रावण महिन्यात देशभरातून मोठ्या संख्येने भाविक प्रभू वैद्यनाथाच्या दर्...