राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते बीड जिल्हा दौऱ्यावर; उद्या परळी वैजनाथ येथे देणार भेट

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
       राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते हे दि.६ व ७ ऑगस्ट दोन दिवस बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते पोलीस दलाचा प्रशासकीय आढावा, विविध बैठका व जिल्ह्य़ातील काही पोलीस ठाण्यांनाही भेटी देणार आहेत. पोलीस महासंचालक स्वतः दोन दिवसांच्या दौऱ्यावर असल्याने हा अतिशय महत्त्वपूर्ण दौरा समजला जात आहे.
       पोलीस महासंचालक सदानंद दाते हे दोन दिवसांच्या बीड दौऱ्यावर  आहेत. या दौऱ्यात जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था,  गुन्हेगारी आणि पोलीस दलातील प्रशासकीय आढावा ते घेणार आहेत.स्वतः पोलीस महासंचालक बीड दौऱ्यावर येत असल्याने प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.पोलीस महासंचालक हे परळी वैजनाथ येथेही भेट देणार आहेत. या अनुषंगाने परळी पोलीस ठाण्यात तयारी सुरु असुन पोलीस ठाण्याचा परिसर चकाचक करण्यात आला आहे.तसेच रंगरंगोटी व सुशोभीकरण करण्यात आले आहे.बीड जिल्ह्यातील परळी व अंभोरा या दोन पोलीस ठाण्यांना भेटी देणार असल्याची माहिती आहे.उद्या दि.७ रोजी सकाळी ७ वा. ते बीड येथून परळीकडे रवाना होतील. ९.३० वा. ते परळी वैजनाथ येथे दाखल होणार आहेत. परळी येथे ते आढावा घेणार आहेत.पोलीस महासंचालक सदानंद दाते यांचा सहा व सात ऑगस्ट रोजी होणारा बीड जिल्हा दौरा अत्यंत महत्त्वाचा समजला जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार