पिट लाईन, वंदे भारतसह नव्या रेल्वेगाड्यांची मागणी: परळी रेल्वे विकास समितीचे निवेदन
परळी रेल्वे विकास समितीच्या धरणे आंदोलनाच्या दणक्यानंतर द म रेल्वेचे सिकंदराबाद विभागीय व्यवस्थापकांनी परळीत घेतला आढावा पिट लाईन, वंदे भारतसह नव्या रेल्वेगाड्यांची मागणी: परळी रेल्वे विकास समितीचे निवेदन परळी वैजनाथ : प्रतिनिधी... शतकाहून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी आणि प्रवाशांच्या विविध प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी परळी रेल्वे विकास समिती, मराठवाडा जनता विकास परिषद आणि विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर. गोपालकृष्णन यांना भेटून निवेदन सादर केले. परळी रेल्वे विकास समितीच्या ०८ जून च्या धरणे आंदोलना नंतर दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर. गोपालकृष्णन यांनी आज (दि.१८) सकाळी परळी वैजनाथ रेल्वे स्थानकापासून भेट देऊन नविन रेल्वे स्थानक उभारणी,रेल्वे मार्गाची कामे, प्रशासकीय विषय,प्रवाशी सुविधा आदींबाबत परळीत आढावा घेतला. परळी रेल्वे विकास समिती, मराठवाडा जनता विकास परिषद आणि विविध सामाजिक ...