परळीतून महायुतीचे उमेदवार बस्वराज पाटील यांना एकगठ्ठा मतदान करण्याचे धनंजय मुंडे यांचे आवाहन

महायुतीचे बीड - लातूर - धाराशिवचे उमेदवार बस्वराज पाटील यांनी घेतली धनंजय मुंडे यांची भेट


परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - परळी वैद्यनाथ येथील सर्व नगरसेवक यांनी आपले पहिल्या पसंतीचे मत महायुतीचे अधिकृत उमेदवार बस्वराज पाटील यांच्या पाठीशी उभे करावे, असे आवाहन माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी आज संपन्न झालेल्या बैठकीत केले आहे. 

बीड - लातूर - धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेचे महायुतीचे उमेदवार बस्वराज पाटील यांनी आज धनंजय मुंडे यांची नाथरा येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्री. मुंडे यांनी बस्वराज पाटील यांचे स्वागत केले. तसेच याप्रसंगी परळीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मित्र पक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांना मतदानाचे आवाहन केले. 

यावेळी युवक नेते अजय मुंडे, दिव्यांग कल्याण महामंडळाचे डॉ. संतोष मुंडे, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, रामेश्वर मुंडे, उपनगराध्यक्ष राजा खाँ पठाण, रवींद्र गित्ते, भावड्या कराड, जयपाल लाहोटी, प्रणव परळीकर यांसह परळी वैद्यनाथ शहरातील विविध वॉर्डातील नगरसेवक आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!