इमेज
आ. धनंजय मुंडे यांचे स्पष्ट निर्देश ; श्रावणापूर्वी परळीतील ८४ खोल्यांचे भक्तनिवास होणार सुरू ! भक्तनिवासाच्या उर्वरित कामांचा कंत्राटदाराला सोबत घेत सर्व संबंधितानी घेतला आढावा परळी वैजनाथ | प्रतिनिधी       बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथ येथे दर्शनासाठी येणाऱ्या लाखो शिवभक्तांच्या सुविधेसाठी उभारण्यात आलेले ८४ खोल्यांचे सुसज्ज भक्तनिवास आगामी श्रावण महिन्यापूर्वी सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्या निर्देशानंतर संबंधित यंत्रणांनी भक्तनिवासाच्या उर्वरित कामांचा आढावा घेत नियोजन निश्चित केले आहे.        परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत माजी मंत्री धनंजय मुंडे व ना. पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नातून निधी प्राप्त झाला होता. या निधीतून विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, विविध कारणांमुळे पोलीस स्टेशनजवळ उभारण्यात आलेले ८४ खोल्यांचे भक्तनिवास  अपूर्ण अवस्थेत पडून आहे.या पार्श्वभूमीवर ही बाब धनंजय मुंडे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर त्यांनी तात्काळ दखल घेत संबं...

४ कि.मी.घोडेस्वारी करत पोहचला शाळेत

परळी वैजनाथ: शाळेचा पहिला दिवस: 'पठ्ठयाची' घोड्यावरून शाळेत हटके एन्ट्री!


विद्यार्थ्याची हटके सुरुवात ; पहिल्याच दिवशी वेधले सर्वांचे लक्ष

 परळी वैजनाथ : प्रतिनिधी....

       शाळेचा पहिला दिवस म्हटला की नव्या पुस्तकांचा सुगंध, मित्रांची भेट आणि उत्साहाचे वातावरण असते. पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा होतो या अनुषंगानेच श्री. केदारी महाराज विद्यामंदिर, नंदनज येथे यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले. कासारवाडी येथील चि. प्रशांत तुकाराम गुट्टे हा विद्यार्थी थेट घोड्यावर स्वार होऊन शाळेत प्रवेशासाठी आला, त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थित पालकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली. या विद्यार्थ्याची हटके एण्ट्री पहिल्याच दिवशी  सर्वांचे लक्ष वेधणारी ठरली.

       आज पासून संपूर्ण शाळा सुरू झाल्या आज शाळेचा पहिला दिवस असल्याने विविध शाळांमध्ये प्रवेशोत्सवाची लगबग पाहायला मिळाली. परळी तालुक्यातील नंदनज येथील श्री. केदारी महाराज विद्यामंदिर येथेही विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवाचा उत्साह बघायला मिळाला. शाळेच्या वतीने मुख्याध्यापक चेतन सौंदळे तसेच सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत केले. प्रवेशोत्सवाचा हा उत्साह सुरू असतानाच अनपेक्षित पणाने अचानक एका विद्यार्थ्यांची एन्ट्री हटकेपणाने घोड्यावरून शाळेच्या आवारात झाली. या लक्षवेधी इंट्रीने शिक्षकांसह अन्य विद्यार्थ्यांसाठीही लक्षवेधी ठरली. इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच मुख्याध्यापक व शिक्षकांनी घोडेस्वार प्रशांतचेही शाळेत स्वागत केले. मात्र घोड्यावरून शाळेत आलेल्या प्रशांतची हटके एन्ट्री हा दिवसाचा चर्चेचा विषय ठरला.

    यावेळी मुख्याध्यापक चेतन सौंदळे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दलची जिद्द आणि धडपड विशेष कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांची आवड, क्षमता, व्यक्तिमत्त्व विकास आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यांचा समतोल साधत त्यांना योग्य दिशा देणे ही आम्हा शिक्षकांची जबाबदारी आहे. २१ व्या शतकातील कौशल्याधारित व सक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी शाळा कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.शाळेच्या पहिल्याच दिवशी घोड्यावरून आलेल्या विद्यार्थ्याने केवळ उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले नाही, तर शिक्षणासाठीची ओढ आणि ग्रामीण संस्कृतीचा अभिमान यांचाही सुंदर संगम घडवून आणला असे त्यांनी नमूद केले.


*४ कि.मी.घोडेस्वारी करत पोहचला शाळेत....*

     दरम्यान नंदनज येथील शाळेला आजूबाजूच्या गावातील विद्यार्थी प्रवेश घेतात. आज घोडेस्वारी करून आलेला प्रशांत गुट्टे हा विद्यार्थी कासरवाडी या गावचा रहिवासी आहे. कासारवाडी ते नंदनज हा मधल्या मार्गाने सुमारे चार किलोमीटर अंतराचा मार्ग आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी घोड्यावरूनच जायचे असा निश्चय करून प्रशांत गुट्टे हा विद्यार्थी एकटाच घोडेस्वारी करत चार किलोमीटर अंतर कापून शाळेमध्ये पोहोचला. कासरवाडी या त्याच्या गावी आठवीपर्यंतची शाळा असल्याने आठवीपर्यंत तो गावातील शाळेतच होता. मात्र पुढील वर्ग म्हणजेच नववीच्या वर्गासाठी त्यांने आता श्री केदारी महाराज विद्यामंदिर नंदनज येथे प्रवेश घेतला आहे. शाळेच्या आजच्या पहिल्या दिवशी त्याने घोडेस्वारी करून केलेल्या हटके एण्ट्रीने प्रवेशोत्सवाच्या उत्साहात ही एक लक्षवेधी घटना ठरली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या