सदगुरु सेवा समितीच्या-वतीने महाप्रसादाचे आयोजन
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार
बद्रुद्दीन शेख (कार्य अध्यक्ष), अमर रोडे (सचिव) तसेच सद्दाम हुसेन (संघटक) यांचा सत्कार
परळी वैजनाथ | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या विविध पदांवर नुकत्याच निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ युवा नेते अमित घाडगे पाटील यांच्या कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन अभिनंदन करण्यात आले.
सत्कार करण्यात आलेल्या त्या प्रसंगी पदाधिकाऱ्यांमध्ये तालुकाध्यक्ष बाबा शिंदे, शहराध्यक्ष महादेव गंगणे, परळी नगर परिषदेचे गटनेते नितीन बागवले, नगरसेवक कादर कुरेशी, युवक शहराध्यक्ष सय्यद फिरोज, श्रीनिवास राऊत, बद्रुद्दीन शेख (कोषाध्यक्ष), अमर रोडे (सचिव) तसेच सद्दाम हुसेन (संघटक) यांचा समावेश होता.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे लढा देण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसह आगामी राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यात आली. सत्कार समारंभामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून पक्ष बळकटीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प केला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा