रामराव कांबळे यांची अखिल भारतीय मातंग संघाच्या परळी तालुकाध्यक्षपदी निवड परळी (प्रतिनिधी) दिनांक 12 जून 2026 रोजी कृष्णाई हॉटेल अंबाजोगाई येथे आठ टक्के आरक्षण संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला उपस्थित असलेल्या अखिल भारतीय मातंग संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा त्याग माता क्रांतीज्योती कुसुमताई बाबासाहेब गोपले यांनी रामराव कांबळे यांची अखिल भारतीय मातंग संघ परळी तालुका अध्यक्षपदी निवड केली तसेच दामोदर ताटे यांची डॉ .बाबासाहेब गोपले सेना सोनपेठ तालुका सरचिटणीसपदी निवड केली. या बैठकीस डॉ. बाबासाहेब गोपले, सेना सोनपेठ तालुकाध्यक्ष वसंत साळवे, अंबाजोगाई तालुका अध्यक्ष काष्टी मॅडम, भिवंडी शहरप्रमुख जोगदंड सर, रामराव कांबळे , दामोदर ताटे, तुकाराम साळवे आदींची उपस्थिती होती. मातंग समाजाला स्वातंत्र्य आठ टक्के आरक्षण मिळाव यासाठी क्रांतीज्योती कुसुमताई गोपले यांनी अंबाजोगाई शहर या ठिक ठिकाणी बैठका आयोज...