पिट लाईन, वंदे भारतसह नव्या रेल्वेगाड्यांची मागणी: परळी रेल्वे विकास समितीचे निवेदन

इमेज
परळी रेल्वे विकास समितीच्या धरणे आंदोलनाच्या दणक्यानंतर द म रेल्वेचे सिकंदराबाद  विभागीय व्यवस्थापकांनी परळीत घेतला आढावा पिट लाईन, वंदे भारतसह नव्या रेल्वेगाड्यांची मागणी: परळी रेल्वे विकास समितीचे निवेदन परळी वैजनाथ : प्रतिनिधी...    शतकाहून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी आणि प्रवाशांच्या विविध प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी परळी रेल्वे विकास समिती, मराठवाडा जनता विकास परिषद आणि विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद  विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर. गोपालकृष्णन यांना भेटून  निवेदन सादर केले.       परळी रेल्वे विकास समितीच्या ०८ जून च्या धरणे आंदोलना नंतर दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद  विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर. गोपालकृष्णन यांनी आज (दि.१८) सकाळी परळी वैजनाथ रेल्वे स्थानकापासून भेट देऊन नविन रेल्वे स्थानक उभारणी,रेल्वे मार्गाची कामे, प्रशासकीय विषय,प्रवाशी सुविधा आदींबाबत परळीत आढावा घेतला. परळी रेल्वे विकास समिती, मराठवाडा जनता विकास परिषद आणि विविध सामाजिक ...

 घरावरील छाप्यात ३६ हजारांचा गांजा जप्त; ७० वर्षीय महिलेला पोलिसांकडून अटक


बीड: शहरातील पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका घरावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गांधीनगर येथील शिवसेना कमानीजवळील एका घरात अनधिकृतपणे गांजा बाळगून त्याची विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती पेठ बीड पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी १६ जून २०२६ रोजी दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास छापा टाकून ३६ हजार ४४४ रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे.  

पोलीस निरीक्षक निलेश केळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने आणि नगर परिषदेच्या शासकीय पंचांसमक्ष ही कारवाई केली. संशयित कमलबाई राधाकिसन खंडागळे (वय ७०, रा. गांधीनगर, पेठ बीड) हिच्या घराची झडती घेतली असता, झाडू बनवण्याच्या पानाच्या बंडलमध्ये लपवून ठेवलेला ६ किलो ७४ ग्रॅम निव्वळ गांजा मिळून आला. हा अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने साठवला असल्याने पोलिसांनी तो जागीच सीलबंद केला असून ७० वर्षीय संशयित महिलेला महिला अंमलदारांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे. आरोपीविरुद्ध गुंगीकारक औषधीद्रव्ये अधिनियम (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक नित्यानंद उबाळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या