रामराव कांबळे यांची अखिल भारतीय मातंग संघाच्या परळी तालुकाध्यक्षपदी निवड

परळी (प्रतिनिधी)   दिनांक 12 जून 2026 रोजी कृष्णाई हॉटेल अंबाजोगाई येथे आठ टक्के आरक्षण संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला उपस्थित असलेल्या अखिल भारतीय मातंग संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा त्याग माता क्रांतीज्योती कुसुमताई बाबासाहेब गोपले यांनी  रामराव कांबळे यांची अखिल भारतीय मातंग संघ परळी तालुका अध्यक्षपदी निवड केली  तसेच दामोदर ताटे यांची डॉ .बाबासाहेब गोपले सेना सोनपेठ तालुका सरचिटणीसपदी निवड    केली.                             

      या  बैठकीस डॉ. बाबासाहेब गोपले,  सेना सोनपेठ तालुकाध्यक्ष  वसंत साळवे, अंबाजोगाई तालुका अध्यक्ष काष्टी मॅडम, भिवंडी शहरप्रमुख जोगदंड सर,  रामराव कांबळे , दामोदर ताटे, तुकाराम साळवे आदींची उपस्थिती होती. मातंग समाजाला स्वातंत्र्य आठ टक्के आरक्षण मिळाव यासाठी क्रांतीज्योती कुसुमताई गोपले यांनी अंबाजोगाई शहर या ठिक ठिकाणी बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या.  आणि या ठिकाणी  डॉ बाबासाहेब गोपले सेना सोनपेठ तालुकाध्यक्ष वसंत साळवे यांच्या नेतृत्वाखाली  रामराव कांबळे यांची अखिल भारतीय मातंग संघ परळी तालुका अध्यक्षपदी निवड करून व श्री दामोदर ताटे यांची डॉ  बाबासाहेब गोपले सेना सोनपेठ तालुका सरचिटणीस पदी निवड करून या दोघांना क्रांतीज्योती कुसुमताई गोखले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.  रामराव  कांबळे व  दामोदर  ताटे  यांचे निवडीबद्दल  सर्वत्र  स्तरातून  अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!