पुरस्कारप्राप्त कामगारांची नावे:

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे पुरस्कार : ५१ कामगारांना विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर




बीड (प्रतिनीधी) : कामगार विश्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या कामगार भूषण व  विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार-२०२४ चे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. कामगार कल्याण मंडळाकडून  राज्यातील ५१  कामगारांना विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार व एका कामगाराला कामगार भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. कामगार कल्याण निधी भरणाऱ्या कामगार व कर्मचाऱ्यांना साहित्य, सामाजिक, शैक्षणिक,  क्रीडा आदी क्षेत्रात विशेष योगदानासाठी हे पुरस्कार दिले जातात. गुणवंत कामगार पुरस्कारासाठी रु. २५ हजार, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र आणि कामगार भूषण पुरस्कारासाठी रु. ५० हजार, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येते.

पुरस्कारप्राप्त कामगारांची नावे: 

अरविंद हळदकर- कोल्हापूर(कामगार भुषण)अंकुश जाधव- पुणे, ज्योत्सना निमगडे- चंद्रपूर, अविनाश वाडेकर- पुणे,  माधुरी निर्माळे- अमरावती,  सुखदेव फुलारी- अहिल्यानगर, हेमंत पवार- पुणे, कविता नवघरे- चंद्रपूर, हनुमंत ढवळे- सातारा, मनाली साळवी- रत्नागिरी, नितीन राव- उरण, रवींद्र देशमुख- मुंबई, जीविता नाईक- मुंबई, राजेश चौधरी- चिखली, प्रकाश वीर- खेड, ज्योत्सना मोहिते- मुंबई,  भानुदास शेवाळे- जालना, वैशाली अग्निहोत्री- अमरावती,  दिगंबर इंगळे- चंद्रपूर, गणेश राणे- बुलढाणा,  जगदीश गोडसे- नाशिक, रोहिदास गराडे- पुणे, उमेश कांबळे- रायगड,  प्रमोद पाटील- रायगड, शेख अमीर जलील-बीड,  सुहासकुमार दाणी- छ. संभाजीनगर,  उत्तम गायकवाड- पुणे, त्रिवेणी कांबळे- छ.संभाजीनगर, मंगेश सावंत- मुंबई, तुषार चौधरी- पुणे, विकास शहाणे- पुणे,  लक्ष्मण शिंदे-पुणे,  संदीप शेंडे-अमरावती, अनिल माने- चाकण, गणेश कापडणीस- नाशिक, मिलिंद जाधव- सांगली, रोहिदास चौधरी- तळेगाव, दीपक पेडणेकर- परळ,  राजेश मयेकर- रत्नागिरी,  ज्ञानेश्वर पाटील- रत्नागिरी, नरेंद्र गिरासे- धुळे, चंद्रकांत रणझुंजारे-  धाराशिव,  बापू वाघ- मालेगाव,  संजय पाटील- छ.  संभाजीनगर, संतोष मोरे- मुंबई,  अनिल जठार- छ. संभाजीनगर,  संतोष पावसकर-  मुंबई,  अर्जुन वारिंगे- पुणे,  सुनील गांगण- मुंबई, शिवकुमारमाठवाले- नांदेड,  संतोष हिरुडकर- नागपूर, अनिल रामाने- पुणे यांना गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!