MB NEWS :धोंडीराम मुंडे यांचे निधन

 धोंडीराम मुंडे यांचे निधन

परळी (प्रतिनीधी)

 पांगरी पं.स.गणाच्या सदस्य सौ मिरताई वसंत तिडके तथा पांगरी ग्रामपंचायत उपसरपंच ऍड श्रीनिवास मुंडे यांचे वडील पांगरी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन धोंडीराम मुंडे यांचे काल रविवार  दि.16 रोजी निधन झाले.मृत्युसमयी त्यांचे वय 70 वर्षे होते.ते परळी तालुक्यातील राजकिय,सामाजीक क्षेत्रातील सुपरिचित व्यक्तीमत्व होते.

 पांगरी सेवा सोसायटीचे पंचवीस वर्षे चेअरमन पद,पांगरी गावचे दहा वर्षे सरपंचपद,खरेदी-विक्री संघाचे सदस्यापद भुषविलेले धोडींराम मुंडे हे राजकिय व सामाजिक क्षेत्रात सतत सक्रिय होते.रविवार दि.16 ऑगस्ट रोजी रात्री 10.30 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात तीन मुलं,एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार असुन कै.धोडींराम मुंडे यांच्या पार्थिवावर पांगरी येथे आज दि.17 रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले तर राख सवडण्याचा कार्यक्रम दि.18 रोजी सकाळी 7 वाजता आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !