MB NEWS:विठ्ठल मंदिर खुलं करण्यासाठी पंढरपुरात आंदोलन; वंचितचे कार्यकर्ते आक्रमक*

 *विठ्ठल मंदिर खुलं करण्यासाठी पंढरपुरात आंदोलन; वंचितचे कार्यकर्ते आक्रमक*



पंढरपूर : श्री विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यासाठी आज (दि. 31) पंढपुरात वंचित बहुजन आघाडी व विश्व वारकरी संघटनेचे आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मंदिराकडे जाणारे रस्ते पोलिसांनी बॅरिकेट्स लावून बंद केले आहेत. यामुळे मंदिर परिसराला छावणाचे स्वरुप आले आहे.


वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर हे आंदोलनात सहभागी झाले असून येथे हजारोच्या संख्येने लोकांची गर्दी आहे. त्यांनी एक लाख भाविकांच्या उपस्थितीत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, मात्र प्रत्यक्षात एक हजारच्या आसपास भाविक विशेषतः वंचितचे कार्यकर्त उपस्थित आहेत. 


आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. त्रिस्तरीय बंदोबस्त असून 450 पोलिस  अधिकारी, कर्मचारी तैनात आहेत, मंदिर परिसर सील केला आहे. आंदोलकांना पोलिसांनी शिवाजी चौक येथे अडवले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार