प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:मराठा आरक्षणाची पहिली ठिणगी नाशिकमध्ये, 3 दिवसांत आक्रमक आंदोलनाचा इशारा





----------------------------------- 

*◼️मराठा आरक्षणाची पहिली ठिणगी नाशिकमध्ये, 3 दिवसांत आक्रमक आंदोलनाचा इशारा*

----------------------------------- 


नाशिक, 10 सप्टेंबर : मराठा आरक्षण (maratha reservation) प्रकरणात सुप्रीम कोर्टात (maratha quota in supreme court) सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने वर्ष 2020-21 साठी मराठा आरक्षण स्थगित करण्याचा निर्णय दिला आहे. याचे पडसाद आता राज्यभर उमटायला सुरूवात झाली आहे. मराठा आरक्षणाचा वाद आता पुन्हा पेटला आहे. आज क्रांती मोर्चा समनव्याकांची नाशकात बैठक पार पडणार आहे. यामध्ये राज्य सरकारचा निषेध करत थेट गनिमी काव्यानं आंदोलन करणार असल्याची आक्रमक भूमिका घेतली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आक्रमक आंदोलनाची रणनीती आखण्यासाठी नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक पार पडत आहे. आता आंदोलन गनिमी काव्यानं करणार अशी ठाम भूमिका जाहीर करत राज्य सरकारचाही निषेध केला आहे. या आंदोलनाची पहिली ठिणगी हा नाशिकमध्ये पेटणार असल्याची चिन्ह आहेत. कायदेशीर लढाईसोबत गनिमी कावाही करू असा या बैठकीत निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीनंतर सरकारला 3 दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. भूमिका स्पष्ट करा नाहीतर आंदोलन अटळ आहे अशी आक्रमक भूमिका क्रांती मोर्चा समनव्याकांनी घेतली आहे. त्यामुळे आता राज्यात एकीकडे कोरोनाचा धोका असताना दुसरीकडे आंदोलनाचा इशारा दिल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या