MB NEWS: *परळीत लाखो रुपयांचा गुटखा पकडला;१६बॅग व जीप पोलीसांनी घेतलं ताब्यात*

 *परळीत लाखो रुपयांचा गुटखा पकडला;१६बॅग व जीप पोलीसांनी घेतलं ताब्यात*



परळी वै.(प्रतिनिधी)

संभाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत गुरुवारी (दि.3) रात्री पोलीसांनी जीपमधून वाहतूक केला जाणारा लाखो रुपयांचा गुटखा ताब्यात घेतला.  परळीत सातत्याने गुटख्याची अवैध वाहतूक होत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. पोलीसांनी जीप ताब्यात घेतली असून पुढील कार्यवाही सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गुरुवारी रात्री संभाजीनगर ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक चाँद मेंढके व कर्मचार्‍यांनी शहरात एक संशयित जीप शहरातील गंगाखेड रोडवर थांबवून तपासणी केली. या जीपमध्ये गुटखा भरलेल्या 16 बॅग आढळून आल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीसांनी गाडी जप्त केली असून पुढील कार्यवाही सुरु असल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक चाँद मेंढके यांनी दिली. दरम्यान परळीतूनच बीड जिल्ह्यात गुटख्याचा काळा धंदा तेजीत केला जात असल्याचे स्पष्ट होवू लागले आहे. 

---

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !