मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

MB NEWS:लातूर- मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

 लातूर- मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न 


लातूर .....मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने निराश झालेल्या चाकूर तालुक्यातील बोरगाव येथील एका युवकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. आज गुरुवारी (दि. १०) सकाळी साडेअकराच्या सुमारास चाकूर येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात ही घटना घडली. किशोर कदम (वय २५) असे विष प्राशन केलेल्या युवकाचे नाव आहे. 

प्रारंभी त्यास चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला लातूरला हलविण्यात आल्याची माहिती तहसीलदार शिवानंद बिडवे यांनी दिली. सदर युवक उच्चशिक्षित असून तो राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत होता. आरक्षणासाठी केलेली लढाई व नोकरी मिळवण्यासाठी केलेली मेहनत मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे वाया गेली आहे. व्यथित होऊन मी हे कठोर पाऊल उचलत असल्याचे त्याने आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....