MB NEWS:दादाहरी वडगाव चे धरणे परळीतील मराठा तरुणांनी भेट देऊन घेतला आंदोलनात सहभाग

आज ६ वा दिवस:मराठा आरक्षणासाठी दादाहरी वडगाव चे धरणे 


परळीतील मराठा तरुणांनी भेट देऊन घेतला आंदोलनात सहभाग



परळी l प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव येथे बेमुदत साखळी पद्धतीने आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे. गावातील महिला, लहान मुले, तरुण आणि जेष्ठांचाही यात उत्स्फूर्त सहभाग आहे. आज आंदोलनाचा ६ वा दिवस असून जोपर्यंत मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत अखंडपणे हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय सर्वमुखी घेण्यात आला आहे.
      जोपर्यंत मराठा समाजाच्या या जिव्हाळ्याच्या मागण्या पूर्ण केल्या जाणार नाहीत तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा ठाम निर्णय दादाहरी वडगाव ग्रामस्थांनी घेतला आहे. या ठिकाणी आज परळीतील मराठा तरुणांनी भेट देऊन आंदोलनात सहभाग घेतला.यावेळी ओम काळे, निकेश पाटील ,पवन बोडके ,अरुण सपाट,साईराज देशमुख, कैलास नाईकवाडे ,भागवत साबळे,गोविंद जाधव,महादू साबळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार