MB NEWS:डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी - ओमप्रकाश बुरांडे

 डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी - ओमप्रकाश बुरांडे



 परळी येथे कामगार कल्याण केंद्रात डाॅ. कलामांना अभिवादन


 परळी (प्रतिनिधी) : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे कार्य प्रत्येक तरुणांना प्रेरणा देणारे आहे. रामेश्वरम मधील एका छोट्या गावापासून ते राष्ट्रपतिपदापर्यंत झालेला डॉ. कलाम यांचा विलक्षण प्रवास युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाश बुरांडे यांनी केले.

 येथील कामगार कल्याण केंद्रात भारतरत्न माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त गुरूवारी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाश बुरांडे बोलत होते. पत्रकार जगदीश शिंदे, केंद्र संचालक आरेफ शेख यांची उपस्थिती होती.

युवकांनी पुस्तक हेच आपले वैभव आहे, हे डाॅ. कलाम यांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन ओमप्रकाश बुरांडे यांनी केले.

उज्वला बडवे, सोनम गव्हाणे, मसरत खान, तुलसी कमलू, काजल भोसले यांच्यासह विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते. 



 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !