प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी सण साध्या पध्दतीने साजरा करण्याचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांचे आवाहन*

 *कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी सण साध्या पध्दतीने साजरा करण्याचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांचे आवाहन*



बीड,दि. 09 :- (जि.मा.का) कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितचा विचार करता या वर्षीचा दिपावली उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने या वर्षीचा दिपावली उत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे बाबत आवाहन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केले आहे.


यासाठी खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचना जनतेस देण्यात येत आहेत.

जिल्हयातील मोठ्या शहरांमध्ये व गांवामध्ये अद्यापही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. चालू वर्षी कोविड या संसर्गजन्य रोगाचा झालेला प्रादुर्भाव विचारात घेवून गेल्या सात आठ महिण्यात आलेले सर्व धर्मीय सण, उत्सव अंत्यत साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केले आहेत. या वर्षीचा दिपावली उत्सव कोविड कालावधीत साजरा केलेल्या अन्य उत्सवांप्रमाणेच पूर्ण खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करावा.


कोविड संसर्गामुळे बंद करण्यात आलेली राज्यातील धार्मिक स्थळे अद्याप खुली करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे साजरा केला जाणारा दिपावली उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील याची दक्षतां घेण्यात यावी. उत्सव कालावधीत नागरिकांनी गर्दी टाळावी व मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊ  नये. मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग, संक्रमण वाढणार नाही.


दिपावली हा दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव मानला जातो. या उत्सवा दरम्यान दरवर्षी मोठ्या प्रमाणावर  फटाक्यांची अतिषबाजी करण्यात येते. यामुळे वायु व ध्वनी प्रदुषणाची पातळी वाढून जनसामान्यांच्या तसेच प्राणीमात्रांच्या आरोग्यावर परिणाम झालेल्या अनेकांना फटाकांच्या धुरामुळे वायु प्रदूषणाचा थेट परिणाम होऊन त्रास होण्याची भिती आहे. ही बाब विचारात घेऊन नागरिकांनी चालू वर्षी फटाके फोडण्याचे टाळावे, त्याचा त्रास होऊ शकतो. त्याऐवजी दिव्यांची आरास मोठ्या प्रमाणावर करुन उत्सव साजरा करावा. 


या उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक उपक्रम, कार्यक्रम उदा. दिपावली पहाट आयोजित करण्यात येऊ नयेत. आयोजित करावयाचे झाल्यास ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक इत्यादी माध्यमांद्वारे त्याचे प्रसारण करावे.


सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबीरे उदा. रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यु इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. मात्र त्या ठिकाणी देखील लोकांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येऊ नये, याची दक्षता घेण्यात यावी.


कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगर पालिका, नगर पंचायत, ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. 

*-*-*-*-*-*-*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या