प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:बोअरवेल ऑपरेटरला पळवुन नेत 25 हजार लुटले ;एक आरोपी पोलीसांनी पकडला

 बोअरवेल ऑपरेटरला पळवुन नेत 25 हजार लुटले ;एक आरोपी पोलीसांनी पकडला



परळी (प्रतिनिधी )

 शहरातील बसस्थानक व रेल्वे स्थानकादरम्यान उभ्या असलेल्या बोअरवेल गाडीच्या ऑपरेटरला अंधारात पळवुन नेत रोख 15 हजार रु.व 10 हजार रु.चा मोबाईल असा 25 हजार रु.चा ऐवज लुटल्याची घटना दि.11 रोजी मध्यरात्री घडली.या प्रकरणी संभाजीनगर पोलिसांनी एकास अटक केली आहे.

 सध्या अनेक ठिकाणी कुपनलिका घेण्यात येत आहेत.यासाठी बाहेर राज्यातील मशिन व मजुर परळी परिसरात असुन दि.11 नोव्हेंबर रोजी तामिळनाडू राज्यातील नामागल जिल्ह्यातील रहिवासी पी.शेगर हे बसस्थानक ते रेल्वे स्थानकादरम्यान रस्त्यावर थांबले असता दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांना अंधारात पळवुन नेत त्यांच्याजवळील नगदी 15 हजार रु.व 10 हजार रु.चा मोबाईल लुटुन नेला याप्रकरणी सुनिल सोळंके रा.देवठाणा,ता.धारुर यांच्या फिर्यादीवरुन दोन अज्ञात आरोपींविरुध्द संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपासी अधिकारी व पोलिस कर्मचारी भताने,राठोड, सानप,दुरगे यांनी आजुबाजुच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करुन आरोपींचा छडा लावत आरोपींची नावे निष्पन्न करुन राजु प्रभाकर गायकवाड यास अटक केली तर मुकेश सुभाष बनसोडे याचा पोलिस शोध घेत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या