परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS- *यूपीएससी मुख्य परीक्षेसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना एकरकमी अर्थसहाय्य देण्याच्या योजनेतील 'त्या' अटी रद्द करून मूळ नियमाप्रमाणेच कार्यवाहीचे धनंजय मुंडे यांचे बार्टीला निर्देश*

 *यूपीएससी मुख्य परीक्षेसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना एकरकमी अर्थसहाय्य देण्याच्या योजनेतील 'त्या' अटी रद्द करून मूळ नियमाप्रमाणेच कार्यवाहीचे धनंजय मुंडे यांचे बार्टीला निर्देश*




*बार्टी ने घातलेल्या जाचक अटींमुळे विद्यार्थ्यांनी व्यक्त केली होती नाराजी*


मुंबई (दि. २५) ----- : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्व परीक्षा (यूपीएससी प्रिलीम) उत्तीर्ण झालेल्या मुख्यपरीक्षा 2020 साठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या एक रकमी अर्थसहाय्य योजने साठी बार्टीने घातलेल्या जाचक अटी रद्द करून मागील वर्षीच्या मूळ नियमावलीप्रमाणेच लाभ देण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. 


यूपीएससी मुख्य परीक्षेस पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत एकरकमी ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. यासाठी बार्टी मार्फत अर्ज मागविण्यात आले होते, परंतु अर्ज करताना बार्टी मार्फत त्यांचे स्तरावर विविध नियमावली तयार करून ती जाहिराती मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. 


यातील इतर योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना एकरकमी अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेता येणार नसल्याच्या अटीसह अन्य चार ते पाच अटी जाचक असल्याच्या अनेक विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे तक्रारी केल्या होत्या. 


सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी या अटी तातडीने रद्द करून मागील वर्षी २०१९ मध्ये ज्या नियमावलीनुसार या योजनेचा लाभ दिला होता, त्यानुसारच लाभ देण्यात यावा अशा सूचना बार्टीच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याने, पात्र विद्यार्थ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!