MB NEWS:*धनंजय मुंडेंची परळी मतदारसंघास आणखी एक भेट; ४३५ घरकुले मंजूर*

 *धनंजय मुंडेंची परळी मतदारसंघास आणखी एक भेट; ४३५ घरकुले मंजूर*




परळी (दि. ११) ---- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून मतदारसंघात परळी तालुक्यातील ४३५ कुटुंबांना गोड बातमी मिळाली असून, प्रधानमंत्री आवास योजनेच्या ब गटातील ४३५ घरकुल प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. 


बीड जिल्हा प्रशासनास आजच राज्य शासनाकडून परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीच्या भरपाई पोटी १५३ कोटी रुपये प्राप्त झाले असून, प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ना. मुंडे यांच्या प्रयत्नातून नुकतेच परळी शहरातील घरकुल प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून, त्यांना प्रत्यक्ष धनादेशही वाटप करण्यात आले आहेत.


प्रधानमंत्री आवास योजनेच्या ब गटातील परळी तालुक्यातील विविध गावातील प्राप्त प्रस्तावांपैकी पात्र असलेले घरकुलाचे ४३५ प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून, मंजूर लाभार्थींची यादी परळी तालुका प्रशासनातर्फे प्रसिद्ध करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार