MB NEWS:श्री पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालयात विद्यार्थी दिवस साजरा

 श्री पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालयात विद्यार्थी दिवस साजरा



सिरसाळा :- येथील श्री पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे वतीने दि. 07 नोव्हेंबर रोजी "विद्यार्थी दिवस साजरा" करण्यात आला.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

या प्रसंगी प्राचार्य डॉ एच पी कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षणासाठी प्रथम प्रवेश प्रतापसिंह हायस्कूल सातारा येथे 7 नोव्हेंबर 1930 घेण्यात आला.

त्यांनी आयुष्यभर एक विद्यार्थी म्हणून ज्ञान आत्मसात केले.

म्हणून प्रत्येकाने आपल्या आयुष्यात बाबासाहेबांचा आदर्श घेऊन ज्ञानसंपन्न व्हावे असे विचार मांडले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर जयदीप सोळंके यांनी केले.

 या वेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार