MB NEWS:कामगार कल्याण मंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी झाली गोड कर्मचारी पतसंस्थेने सभासदांना वाटप केले लाभांश

 कामगार कल्याण मंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी झाली गोड

कर्मचारी पतसंस्थेने सभासदांना वाटप केले लाभांश



 परळी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्था औरंगाबादच्या वतीने मराठवाड्यातील १९२ सभासदांना लाभांश वाटप करण्यात आले.


विशेष म्हणजे लाभांशाची रक्कम सभासदांच्या वैयक्तिक बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. 

 या निर्णयाने मराठवाड्यातील कामगार कल्याण मंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे.


कोवीड संसर्गामुळे लाभांश वाटपास अनेक अडचणी येत होत्या. परंतु शासनाने लाभांश वाटपास नुकतीच परवानगी दिली.  

ही परवानगी मिळताच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन निंभोरकर व सचिव भगवान जरारे यांनी उत्कृष्ट नियोजन करून ९ नोव्हेंबर २०२० रोजी मराठवाड्यातील १९२ सभासदांना ८.५ टक्के या व्याज दराने १० लाख ६१ हजार ८२९ रुपयांचे लाभांश वाटप केले.

 विशेष म्हणजे लाभांशाची रक्कम सभासदांच्या वैयक्तिक बँक खात्यावर तात्काळ जमा करण्यात आली. या निर्णयामुळे सभासदांना दिवाळी सणात मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे पतसंस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !