MB NEWS:ईनरव्हीलक्लब परळी च्या वतीने आयोजित सलाद डेकोरेशन स्पर्धा...

 ईनरव्हीलक्लब परळी च्या वतीने आयोजित सलाद डेकोरेशन स्पर्धा...



ईनरव्हीलक्लब परळी च्या वतीने आॅन लाईन सलाद डेकोरेशन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेला शहरातून तसेच परळी शहराच्या परिसरातील लहान गावातूनही भरघोस प्रतिसाद मिळाला.नुकताच या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला..या मधे प्रथम पारितोषिक सौ प्राजक्ता दंडे ,दुसरे पारितोषिक सौ रोहिणी मुंडे आणि तृतीय पारितोषिक सौ शुभांगी दहिवाळ यांना मिळाले. विजेत्यां स्पर्धकांना प्रमाणपत्र आणी सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.आणि प्रत्येक स्पर्धकास प्रमानपत्र देण्यात आले.. स्पर्धेचे परिक्षक म्हणून सौ. किर्ती झंवर आणि सौ.कांचन चांडक यांनी क्लबसाठी सहकार्य केले.यावेळी क्लब  

अध्यक्षा सौ.शोभना सौंदळे ,ट्रेझरर् सौ. शैला बाहेती एडिटर‌ सौ.ऊमा समशेटे उपस्थित होते.हा कार्यक्रम ऊमा समशेटे यांच्या निवासस्थानी पार पडला..या कोरोनाच्या काळातही ईनरव्हील क्लबचे कार्य चालूच आहे आणि या साठी क्लबच्या कार्याचे कौतुक सर्व ठिकाणी होत आहे.आणि हि माझ्या साठी अभिमानाची गोष्ट आहे असे ऊद्गगार‌ क्लबच्या अध्यक्षा‌ सौ. शोभना सौंदळे यांनी काढले...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार