MB NEWS: *उषाबाई बालासाहेब राजुरकर यांचे निधन*

 *उषाबाई बालासाहेब राजुरकर यांचे निधन*



परळी वैजनाथ प्रतिनिधी

      येथील अंबेवेस भागातील प्रतिष्ठित व सर्व परिचित असलेल्या तथा जुन्या पिढीतील क्षेत्रोपाध्याय स्व. बालासाहेब राजुरकर यांच्या पत्नी उषाबाई राजुरकर यांचे आज दि.७ रोजी  निधन झाले.अॅड.गिरिष राजुरकर,    क्षेत्रोपाध्याय शिरिष, नितीन राजुरकर व नवनीत राजुरकर     यांच्या त्या मातोश्री होत.     

    उषाबाई बालासाहेब राजुरकर  यांचे अल्पश: आजाराने    निधन झाले. मृत्यू समयी त्या ७२ वर्षे वयाच्या होत्या. त्यांच्या पश्चातअॅड.गिरिष राजुरकर,  क्षेत्रोपाध्याय शिरिष, नितीन व नवनीत राजुरकर  ही चार मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. प्रेमळ स्वभाव, धार्मिक वृत्ती व सर्वदुर परिचय ही  त्यांची  विशेषता होती. अतिशय मनमिळाऊ स्वभाव, कुटुंबवत्सल व सर्वपरिचित असलेल्या उषाबाई राजुरकर यांच्या निधनाबद्दल सर्वस्तरातून शोकभावना व्यक्त होत आहेत. त्यांच्या निधनाने राजुरकर कुटुंबावर कोसळलेल्या या दु:खात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार