MB NEWS:14 सप्टेंबर रोजी बीड जिल्हा काँग्रेसचे ऑनलाईन प्रशिक्षण शिबीर* *_जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे-राजकिशोर मोदी यांचे आवाहन_

 *14 सप्टेंबर रोजी बीड जिल्हा काँग्रेसचे ऑनलाईन प्रशिक्षण शिबीर*


*_जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे-राजकिशोर मोदी यांचे आवाहन_


*

अंबाजोगाई (प्रतिनिधी) 

अखिल भारतीय काँग्रेस व प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ऑनलाईन प्रशिक्षण शिबीर सोमवार,दि.14 सप्टेंबर 2020 रोजी आयोजित करण्यात आले आहे.तरी या शिबीरात बीड जिल्हा काँग्रेस, महिला काँग्रेस,युवक काँग्रेस,सेवादल काँग्रेस,अनुसूचित जाती सेल,अल्पसंख्यांक सेल, ओ.बी.सी.सेल,एनएसयुआय,सोशल मिडिया आदी सर्व फ्रंटल आॅर्गनायझेशनचे सन्मानिय नेते,जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांनी झुम अॅप (zoom app) च्या माध्यमातून या ऑनलाईन प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.



बीड जिल्हा काँग्रेसच्या ऑनलाईन प्रशिक्षण शिबीरास प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री ना.अमित विलासरावजी देशमुख,आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा बीड जिल्हा प्रभारी प्रा.सत्संग मुंडे,प्रदेश प्रशिक्षण कार्यक्रम राज्यप्रमुख तथा प्रदेश काँग्रेसचे सचिव अमर खानापुरे, प्रशिक्षण कार्यक्रम मराठवाडा समन्वयक असिफ मुल्ला, निमंत्रक तथा बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी हे मान्यवर झुम अॅपच्या माध्यमातून सहभागी होवून मार्गदर्शन करणार आहेत.ऑनलाईन 

प्रशिक्षण हे सोमवार,दिनांक 14 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे.तरी या शिबीरात बीड जिल्हा काँग्रेस,महिला काँग्रेस,युवक काँग्रेस, सेवादल काँग्रेस, अनुसूचित जाती सेल, अल्पसंख्यांक सेल, ओ.बी.सी.सेल,एनएसयुआय,सोशल मिडिया आदी सर्व फ्रंटल आॅर्गनायझेशनचे सन्मानिय नेते,जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांनी झुम अॅप (zoom app) च्या माध्यमातून या ऑनलाईन प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.सदरील प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी ( झूम अॅप- https://us02web.zoom.us/j/81737534216 ) या लिंक वर जावून कनेक्ट होता येईल असे प्रशिक्षण कार्यक्रमाचे बीड जिल्हा समन्वयक यांनी कळविले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार