MB NEWS:भाजपाचे युवा नेते राजेश गित्ते यांचा वाढदिवस समाजउपयोगी व विविध उपक्रमांने होणार साजरा-गणेश मुंडे

 भाजप युवा नेते राजेश गित्ते यांचा वाढदिवस समाजउपयोगी व विविध उपक्रमांने होणार साजरा-गणेश मुंडे*

 • _गरजूंना मदतीचा हातभार देणार_ •


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- भाजपाचे युवा नेते राजेश गित्ते यांच्या दि.11 सप्टेंबर रोजी वाढदिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च न करता गरजुवंतांना मदतीचा हात देऊन व विविध सामाजिक उपक्रम राबवून अत्यंत साध्य पध्दतीने साजरा होणार असल्याची माहिती राजेश गित्ते मित्र मंडळाचे अध्यक्ष गणेश मुंडे यांनी दिली आहे. 

         पंकजाताई मुंडे आणि खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांचे खंदे समर्थक व हरीसुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश गित्ते यांच्या वाढदिवस कोरोनाच्या संकटात सामाजिक बांधिलकी जपत अत्यंत साध्य पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये सकाळी स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या समाधीस्थळ गोपीनाथगड येथे वृक्षारोपण कोरोना संकटात हैराण झालेल्या नागरिकांना अन्नदान, कोरोना काळात आहोरात्र मेहनत घेणाऱ्या सफाई कामगारांना मास्क व सँनिटायझर, कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा बजावणाऱ्या कर्मचारी यांचा सन्मान पत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच विविध सामाजिक उपक्रमांनी हा वाढदिवस साजरा होणार असल्याचे राजेश गित्ते मित्र मंडळाचे अध्यक्ष गणेश मुंडे यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !