परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS:धक्कादायक; व्यवसायात अपयश आल्याने बार्शीत डॉक्टर पतीची आत्महत्या

 


🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷

*धक्कादायक; व्यवसायात अपयश आल्याने बार्शीत डॉक्टर पतीची आत्महत्या*

----------------------------------- 

बार्शी : अनेक व्यवसाय करुनही अपयश आल्याने नैराश्येतून डॉक्टरपतीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याची घटना पाटील प्लॉट बार्शी येथे  गुरुवारी सकाळी उघडकीस आली. विनायक पुरुषोत्तम वरळे (वय ४०, रा. सांगली) मयताचे नाव आहे. 


याबाबत शहर पोलिसांत केदार पवार यांनी खबर दिली असून, घटनास्थळी पोलीस मारकड यांनी भेट देऊन पंचनामा केला. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेल्या व्यक्तीची पत्नी सांगली येथे डॉक्टर आहे. त्याचे वडीलही बार्शीत राहतात. ते इन्कमटॅक्स आॅफिसमधून निवृत्त आहेत.  मयत हा त्यांच्यापासून वेगळ्या प्लॉटमध्ये राहत होता. व्यवसायातील अपयश आणि पत्नी सांगलीला डॉक्टर आहे. ती आपल्याकडे परत येण्यासाठी आग्रह धरत होती. या साºया प्रकारामुळे नैराश्य येऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस विलास मारकड हे करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!