प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:रविवार दि.१३ रोजी परळी बाजारपेठ कडेकोट बंद ठेवण्याचा व्यापारी महासंघाचा निर्णय - माऊली फड*


 *रविवार दि.१३ रोजी परळी बाजारपेठ कडेकोट बंद ठेवण्याचा व्यापारी महासंघाचा निर्णय - माऊली फड*



परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.११ - शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता परळी व्यापारी महासंघ पुढे सरसावला आहे.विविध व्यापारी महासंघाच्या आज छोटाखानी झालेल्या बैठकीत येत्या रविवारी म्हणजेच दि.१३ रोजी शहरातील मेडीकल दुकाने वगळता सर्व दुकाने कडेकोट बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.व्यापारी महासंघाचे अध्यक्ष माऊली फड व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.


परळीतील व्यापारी महासंघाच्या वतीने रविवार दि.१३ रोजी शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.हा बंद फक्त एकच दिवस असून शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी आपापले दुकाने बंद ठेवावेत असे आवाहन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष माऊली फड यांच्या वतीने करण्यात आले आहे.एक दिवस पूर्ण व्यापार बंद ठेवल्याने कोरोनाची साखळी काही प्रमाणात तोडण्यात व्यापाऱ्यांकडून प्रशासनाला सहकार्य होईल असेही ते म्हणाले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या