MB NEWS-मुख्याध्यापक संतोष कराड यांचे निधन ; परळीच्या शिक्षण क्षेत्रात शोकभावना*

 *मुख्याध्यापक संतोष कराड यांचे निधन ; परळीच्या शिक्षण क्षेत्रात शोकभावना*



 परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

     परळी शहरात विविध उपक्रमांतर्गत हिरीरीने भाग घेत शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान असणारे सर्व परिचित मुख्याध्यापक संतोष कराड यांचे निधन झाले आहे. मृत्यू समयी ते ४८ वर्षे वयाचे होते.त्यांच्या निधनाने परळीच्या शिक्षण क्षेत्रात शोकभावना व्यक्त होत आहेत.

         संतोष कराड हे गेल्या अनेक वर्षांपासून परळीत शिक्षक म्हणून सेवेत आहेत.मुळचे चोपनवाडी येथील संतोष कराड हे परळी तालुक्यातील दाऊतपुर येथील पांडुरंग विद्यालय येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. परळी तालुक्यात शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले.परळीतील शैक्षणिक सर्व उपक्रमात ते नेहमी सक्रीय सहभागी असायचे.विविध शिबीरे, क्रीडा स्पर्धा, विविध संस्था, संघटना आयोजित शिक्षणविषयक उपक्रमांत त्यांनी हिरिरीने सहभाग घेतला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.जेष् नेते बाबुराव मुंडे यांचे ते जावई होत. मुख्याध्यापक संतोष कराड यांच्या निधनाबद्दल परळीच्या शैक्षणिक क्षेत्रात शोकभावना व्यक्त होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार