MB NEWS-नागापुर धरणाच्या दोनपैकी एकाच कालव्यातुन सोडले पाणी; डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

 *नागापुर धरणाच्या दोनपैकी एकाच कालव्यातुन सोडले पाणी; डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी




*परळी वै.ता.१९ प्रतिनिधी*


नागापुर वाण धरणाला असलेल्या दोन्ही कालव्यातुन पाणी सोडण्यात यावे. डाव्या कालव्यावर असलेली चार गावे मात्र पाण्या पासुन वंचित आहेत. मागील काही वर्षात हीच प्रथा पडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रशासना विषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे.

       तालुक्यातील वाण धरणात यावर्षी मे महिन्याच्या मध्या पर्यंत ४१ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. धरणाखालील शेतकरी व नागरिकांना पाण्याची टंचाई भासु नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी दोन दिवसापुर्वी उजव्या कालव्यातुन वाण नदित पाणी सोडले आहे. धरणाला दोन कालवे असताना एकाच कालव्यातुन पाणी सोडताना भेदभाव केलेला दिसुन येतो. डावा कालव्या खाली असलेल्या नागापुर, माळहिवरा, तडोळी वडखेल च्या शेतकऱ्यांना पाण्या पासुन वंचित ठेवण्यात येत आहे. विशेष म्हणजे डाव्या कालव्यातुन उजव्या कालव्याच्या निम्मे पाणी सोडले तरी चारही गावांना चांगला फायदा होतो. मागील दहा वर्षात डावा कालवा लाभ क्षेत्रातील शेतकरी नागापुर धरणाच्या पाण्या पासुन वंचित रहात आहे. या गावांवर वाण धरणाच्या पाण्या बाबत सतत प्रशासनाकडुण अन्याय होत असल्याची संतप्त प्रतिक्रीया वडखेल चे ग्रामस्थ प्रकाश चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार