MB NEWS-*नगर - बीड - परळी रेल्वेमार्गासाठी केंद्र सरकारकडून मिळाला शंभर कोटींचा निधी* *पंकजाताई मुंडे यांनी मानले प्रधानमंत्री मोदी, रेल्वेमंत्री गोयल यांचे आभार*

 *नगर - बीड - परळी रेल्वेमार्गासाठी केंद्र सरकारकडून मिळाला शंभर कोटींचा निधी*



*पंकजाताई मुंडे यांनी मानले प्रधानमंत्री मोदी, रेल्वेमंत्री गोयल यांचे आभार*


परळी । दिनांक ०२ ।

नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाच्या कामाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने शंभर कोटी मंजूर केले,कामाला आणखी गती येणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे आभार" असे त्यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे.


बीडकरांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा असलेला  नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग पूर्ण करण्यासाठी पंकजाताई मुंडे आणि खा.डॉ.प्रितमताई मुंडे सातत्याने प्रयत्न करत आहेत.त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेऊन केंद्र सरकार देखील निधीची पूर्तता करत आहे,केंद्र सरकारने केलेल्या शंभर कोटींच्या तरतुदीमुळे याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.


या रेल्वे प्रकल्पाला गती देण्यासाठी मुंडे भगिनी वेळोवेळी पाठपुरावा करत आहेत.तसेच रेल्वेमार्गाच्या कामामध्ये त्या जातीने लक्ष देऊन आहेत.जिल्हा प्रशासन आणि रेल्वे विभागाकडून आढावा घेणे असो किंवा प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणे असो पंकजाताई आणि प्रितमताईंच्या तत्परतेमुळे रेल्वेमार्गाला गती मिळत आहे.परंतु हा रेल्वे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने देखील त्यांच्या वाट्याचा निधी उपलब्ध करून दयावा अशी मागणी बीड जिल्ह्यातील नागरिकांमधून करण्यात येत आहे.


••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !