प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-पवनराजे निधी बँकेच्या संचालक पदी विनायक राठोड आणि अजय जोशी यांची निवड

 पवनराजे निधी बँकेच्या संचालक पदी विनायक राठोड आणि अजय जोशी यांची निवड      


       

   परळी प्रतिनिधी ... पवनराजे निधी बँकेच्या कार्यालयात परळी शहरातील राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते बाळासाहेब देशमुख यांच्या हस्ते स्विकृत संचालक म्हणून विनायक राठोड, व क्रीडाशिक्षक अजय जोशी यांंची नेमणुक केल्याचे पत्र पवनराजेचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत, यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

     या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बँकेचे उपाध्यक्ष बालासाहेब हंगरगे यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी मा.बाळासाहेब देशमुख यांनी आपले मत व्यक्त करतांना सांगितले की,पवनराजे बँक नावाप्रमाणेच नावरुपास येईल. या वेळी सत्कार मुर्ती विनायक राठोड व अजयजी जोशी यांनी संचालक पदी नियुक्ती केल्या बदल आभार मानले व संस्थेच्या कार्यामध्ये आमचे योगदान देता येईल असे सांगितले .अध्यक्षीय समारोपात अध्यक्ष यांनी संस्थेची माहिती दिली .या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सचिव गोविंद भरबडे,सहसचिव प्रल्हाद काळे ,मा.श्रीकांतजी ढेले,मुख्यध्याक  नांदुरकर सर ,हर्षवर्धन देशमुख, कार्यालयीन कर्मचारी सोमनाथ चाटे, सत्यप्रकाश कराड,प्रभाकर गित्ते आदी या वेळी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या