MB NEWS-गुंगीचे औषध देऊन महिलेवर अत्याचार *धर्मापुरी येथील घटना

 गुंगीचे औषध देऊन महिलेवर अत्याचार....

धर्मापुरी येथील घटना


परळी वै :प्रतिनिधी 

       असाह्य महिलेवर गुंगीचे औषधं बळजबरीने खाऊ घालून अत्याचार केल्याची घटना रविवार दि 25 रोजी तालुक्यातील धर्मापुरी येथे घडली.या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    याबाबतीत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की,तालुक्यातील धर्मापुरी येथील 40 वर्षीय महिला आपल्या पतीच्या निधनानंतर 2 मुले व 1 मुलगी यांचा मजुरी करून सांभाळ करते .याच असहायतेचा फायदा घेत गल्लीतील 27 वर्षीय युवक अफसर शेख याने रविवार दि 25 रोजी दुपारी 4 च्या सुमारास पीडित महिलेच्या घरात बळजबरीने प्रवेश करून मारहाण करीत गुंगीच्या गोळ्या खाऊ घालून जबरी अत्याचार केला.

या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 376,452,323 भां द वी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अधिक तपास पोउपनि पवार हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !