इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-पीएम नरेंद्र मोदी, सीएम उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे उद्या एकाच व्यासपीठावर ?

  पीएम नरेंद्र मोदी, सीएम उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे उद्या एकाच व्यासपीठावर ?





मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सोहळा उद्या (दि. 24 एप्रिल) मुंबईत पार पडणार आहे. या पुरस्कार सोहळ्याला राज्यातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती असणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हेही यावेळी अपस्थित असतील अशी चर्चा आहे. त्यामुळे हे तिन्ही दिग्गज नेते उद्या एकाच व्यासपीठावर एकत्र येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

क्लिक करा व वाचा:🔸 *अंबाजोगाई: भीषण अपघात सविस्तर बातमी....*

मास्टर दिनानाथ प्रतिष्ठान आणि मंगेशकर कुटुंबीयांकडून कला क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या कलावंतांचा सन्मान केला जातो. गेल्या ३२ वर्षांपासून हा सोहळा पार पडत आहे. उद्याचा पुरस्कार सोहळा षण्मुखानंद हॉलमध्ये आयोजित केला आहे. उद्या संध्याकाळी सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, लता मंगेशकर यांच्या नावे दिला जाणारा पहिला पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला असून तो स्वीकारण्यासाठी पीएम मोदी उद्या मुंबईत येत आहेत. या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना आमंत्रण देण्यात आले आहे. राज्यातील हे दोघे दिग्गज नेते उद्याच्या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि उद्धव व राज ठाकरे एकाच मंचावर दिसतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हे देखील वाचा/पहा🔸

क्लिक करा: 🏵️ *अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करा मागणी घेऊन आंदोलन: यावेळी परळीत नेमकं घडलं असं की.......*

क्लिक करा: 🌑 *दुर्दैवी: वडिलांना घरातून हाकलून देण्यासाठी मुलाकडूनच शिवीगाळ व मारहाण; परळीतील घटना*

क्लिक करा: ⭕ *विजेच्या प्रश्नावर सिरसाळा येथील विज वितरणच्या अधिकाऱ्यास माकप चा घेराव*

क्लिक करा: *प्रा. तपस्या गणेशलाल परदेशी-गुप्ता यांना नांदेड विद्यापीठाची डॉक्टरेट प्रदान*

जाहीरात/Advertis

--------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.
--------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!