इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

MB NEWS-नगराध्यक्ष, सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार; सरकारचे ९ महत्त्वपूर्ण निर्णय

 नगराध्यक्ष, सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार; सरकारचे ९ महत्त्वपूर्ण निर्णय




मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत पेट्रोल-डिझेलच्या दर कपातीसोबत महाविकास आघाडी सरकारने रद्द केलेला निर्णयही बदलण्यात आला आहे. २०१८ मध्ये राज्यातील नगराध्यक्ष आणि ग्रामपंचायतीतून सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय झाला होता. परंतु राज्यात २०१९ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय बदलला होता. आज पुन्हा शिंदे-भाजपा सरकारनं हा निर्णय पूर्ववत करण्याची घोषणा केली आहे. 

मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले निर्णयपेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय ( वित्त विभाग)

 राज्यात "स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान" राबविण्यात येणार. (नगर विकास विभाग)

केंद्र पुरस्कृत अमृत अभियान २.०  राज्यात राबविणार(नगर विकास विभाग)

नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेणार(नगर विकास विभाग)

राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा. (ग्रामविकास विभाग)

अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढविणार

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६९ मधील कलम ४३ मध्ये सुधारणा. (ग्रामविकास विभाग)

बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार.महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा. (पणन विभाग)

आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान / यथोचित गौरव करण्याची (दिनांक ३१ जुलै, २०२० रोजी बंद करण्यात आलेली ) योजना पुन्हा सुरु करणार (सामान्य प्रशासन विभाग) 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या