MB NEWS-शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची डॉ.संतोष मुंडे यांच्या हॉस्पिटलमध्ये भेट

 शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची डॉ.संतोष मुंडे यांच्या हॉस्पिटलमध्ये भेट

परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :- 

 परळीतुन आपल्या सामाजिक कार्याची श्रीगणेशा करणार्या व सध्या राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढणार्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांच्या श्रीनाथ हॉस्पिटल येथे भेट दिली.यावेळी अंधारे यांचा सत्कार करण्यात आला.

  आपल्या अभ्यासपूर्ण व आक्रमक भाषणामुळे महाराष्ट्रात चर्चेचा चेहरा बनलेल्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या सामाजिक व राजकिय कार्याची सुरुवात परळी येथुन झालेली आहे.दसरा मेळावा व प्रबोधन यात्रे तील भाषणामुळे त्या चर्चेत आल्या आहेत.मंगळवार दि.18 रोजी त्या परळीत आल्या असता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ संतोष यांच्या डॉ.श्रीनाथ हॉस्पिटल येथे सुषमा अंधारे यांनी भेट दिली.डॉ.अजित केंद्रे,विश्वजित मुंडे,कृष्णा दौंड,ओमकेश फड आदींची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार