MB NEWS-प्रभाग क्रमांक १३ मध्ये आरोग्य तपासणी शिबिर:प्रा.पवन मुंडे यांच्या हस्ते झाला शुभारंभ

 प्रभाग क्रमांक १३ मध्ये आरोग्य तपासणी शिबिर:प्रा.पवन मुंडे यांच्या हस्ते झाला शुभारंभ 








परळी (प्रतिनिधी)

शहरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये आज आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या भागाचे नगरसेवक प्रा.पवन मुंडे यांच्या हस्ते "माता सुरक्षित तर घर सुरक्षित" या उपक्रमाचा शुभरंभ करण्यात आला. दिवसभर चाललेल्या या शिबिराचा शेकडो महिला आणि मुलांना लाभ झाला.


बुधवार दि.१९ रोजी शहरातील मानिकनगर, शिवाजीनगर भागात महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी लक्ष्मण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या शिबिरात शेकडो महिलांची रक्त तपासणी, मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणीसह अनेक आरोग्य तपासण्या करून मोफत औषधोपचार करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी नगरसेवक प्रा.पवन मुंडे यांची उपस्थिती होती. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ परिचारिका आर.आर.येमले, आशा सेविका सविता मैड, खाजाबी शेख, सुलताना तांबोळी आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार