इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

MB NEWS-धनंजय मुंडे हे वाढदिवसानिमित्तपरळीत भेटीसाठी उपलब्ध राहणार

 धनंजय मुंडे हे वाढदिवसा निमित्त शुक्रवारी सकाळी 10 ते 1 दरम्यान परळीत भेटीसाठी उपलब्ध राहणार



*समर्थक - सहकाऱ्यांनी हार, बुके इत्यादी न आणण्याचे आवाहन*


परळी (दि.14) - राज्याचे माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने व वृक्षारोपण व संगोपन करण्याची चळवळ सुरू करून साजरा करण्यात येत असून, धनंजय मुंडे हे त्यांच्या समर्थक-सहकाऱ्यांना भेटून शुभेच्छा स्वीकारण्यासाठी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत परळी शहरातील हालगे गार्डन येथे उपलब्ध राहणार आहेत. 


समर्थक-सहकाऱ्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याचा निर्धार करावा व त्या झाडासोबत एक सेल्फी काढावा, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले होते, त्या आवाहनास सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. 


दरम्यान धनंजय मुंडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत असून, सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी धनंजय मुंडे हे सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत हालगे गार्डन, परळी येथे उपलब्ध असणार आहेत, अशी माहिती परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या