MB NEWS:खा.डॉ.प्रितमताई मुंडेंच्या प्रयत्नाने बीड जिल्ह्य़ातील ९४ कोटी ०७ लक्ष रुपयांच्या प्रस्तावित रस्त्यांना मंजूरी

 खा.डॉ.प्रितमताई मुंडेंच्या प्रयत्नाने बीड जिल्ह्य़ातील ९४ कोटी ०७ लक्ष रुपयांच्या प्रस्तावित रस्त्यांना मंजूरी





बीड । दि. 13

राज्यातील ग्रामीण रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या अध्यक्षेतखाली दिल्ली येथे नुकतीच महाराष्ट्रातील लोकसभा सदस्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील प्रस्तावित रस्ते पुनश्च सादर करून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती, त्यांच्या या मागणीला मोठे यश आले असून जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून चौऱ्याण्णव कोटी सात लक्ष रुपयांच्या निधीला केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.

ग्रामीण भागातील रस्त्यांची दैना फिटावी आणि नागरीकांना दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देण्याकरिता खा. प्रितमताई मुंडे या नेहमीच प्रयत्नशील असतात, त्यांच्या याच प्रयत्नांच्या फलश्रुतीची जिल्हावासीयांना पुन्हा एकदा अनुभूती आली आहे. बीड जिल्ह्यातील प्रस्तावित रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी खा. प्रितमताई मुंडे यांनी केल्यानंतर केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने गेवराई, बीड, केज, अंबाजोगाई, आष्टी, पाटोदा, धारूर, माजलगाव आणि वडवणी तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजूर केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार