MB NEWS:दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल मधिल विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत घवघवीत यश

 दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल मधिल विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत घवघवीत यश

 परळी (प्रतिनिधी)अखिल भारतीय नागरिक विकास केंद्रा तर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील चित्रकला, सुंदर हस्ताक्षर आणि निबंध लेखन स्पर्धेत दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल परळी वैजनाथ मधिल तब्बल २२२ हरहुन्नरी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.. 


 ईयत्ता १ ली तील विद्यार्थ्यीनी कु़. अनाबिया खान व ईयत्ता ३ री तील विद्यार्थ्यीनी  कु. आर्या आजित लिंबकर हिने चित्रकला स्पर्धेतील कला रत्न पुरस्कार २०२२ पटकावला व सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत ईयत्ता ६ वी तील विद्यार्थ्यीनी  कु.अनन्या सोमनाथ मुंडे व ईयत्ता ८ वी तील विद्यार्थ्यीनी  कु.स्नेहा संदीप सातपुते यांनी कला श्री पुरस्कार २०२२ पटकावला तर निबंध लेखन स्पर्धेत ईयत्ता ८ वी तील विद्यार्थ्यीनी  कु. अनुष्का अरूण केंद्रे हिला विद्या भुषण पुरस्कार पटकावला... 


 याप्रसंगी विवेकानंद युथ वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ.ऊषा किरण गित्ते व प्रशालेचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक मा. श्री. किरण गित्ते साहेब सचिव नगरविकास ,सार्वजनिक बांधकाम ,उद्योग, पर्यटन विभाग त्रिपुरा व प्रशालेचे  मुख्याध्यापक श्री. विठ्ठल तुपे यांनी सहभागी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल्स वितरीत केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !