MB NEWS:वीज रोहित्रामुळे ऊसाला लागली आग ऊस जळून खाक; चार एकर ऊस जळाला ;मोठे आर्थिक नुकसान

 वीज रोहित्रामुळे ऊसाला लागली आग ऊस जळून खाक; चार एकर ऊस जळाला ;मोठे आर्थिक नुकसान

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

तालुक्यातील दौनापूर येथील शेतकरी धनराज आघाव यांच्या दौनापूर शिवारातील शेतात वीज रोहित्रच्या शॉर्टसर्किटमुळे चार एकर ऊस जळून खाक झाला आहे .यात आघाव यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.


 दिनांक 17 फेब्रुवारी रोजी दौनापूर शिवारातील उसामध्ये आग लागल्याची माहिती धनराज यांना मिळाली त्यांच्या शेतालगत वीजरोहितक आहे या रोहितकाच्या शॉर्टसर्किटमुळे ऊसाला आग लागली असल्याची माहिती शेतकरी धनराज जगन्नाथ आघाव यांनी दिली यामध्ये धनराज आघाव यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे अगदी तोडणीसाठी आलेला ऊस डोळ्यादेखत जळून खाक झाल्याने धनराज आघाव हे अस्वस्थ झाले.

या आगीची माहिती दौनापूरचे तलाठी व एम एस ई बी चे अधिकारी यांना धनराज आघाव यांनी कळवली आहे याबाबत तात्काळ मदत मिळण्याची मागणी ही धनराज आघाव यांनी केली आहे.

           Video 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !